गडचिरोली : श्रावणमासात हिरवेगार दिसणारे शेतशिवार.  
विदर्भ

वसुंधरेला हिरवाईने नटवत आला श्रावणमास

मिलिंद उमरे : सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : श्रावणमासी हर्ष मानसी

हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येती सर सर शिरवे
क्षणात फिरूनी उन्ह पडे
बालकवींच्या या ओळी श्रावणाचे यथार्थ वर्णन करणाऱ्या आहेत. ग्रिष्मात होरपळलेल्या वसुंधरेला आषाढ चिंब भिजवत न्हाऊ घालतो, तर त्याच्यानंतर येणार श्रावण तिला हिरवा शालू नेसवतो. वसुंधरेला विविध छटांच्या हिरवाईने नटवणारा श्रावणमास गुरुवार (ता. 1) प्रारंभ झाला आहे. या आल्हाददायक महिन्याचा आनंद घेण्यासाठी सगळेच सज्ज झाले आहेत.
"अतिसर्वत्र वर्जयेत' असे संस्कृत भाषेत एक सुभाषित आहे. "अती तिथे माती' हे त्याचेच रांगड्या मराठीतील भाषांतर. अर्थात अतिरेक नेहमीच दुखदायक असतो. ही बाब बहुदा श्रावणाला माहित असावी. म्हणून श्रावणात एकप्रकारचे संतुलन असतो. तो ग्रिष्मासारखा प्रखरतेने तापत नाही आणि आषाढसरींसारखा विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट करत आडदांड कोसळत नाही. एखादा आशीर्वादपर मायेचा हात माथ्यावरून फिरावा, तसा हळूवार बरसतो. त्याच्या सरीही खरेतर सरी म्हणण्याऐवजी ते जलतुषार असतात. हळुवारपणा हा श्रावणाचा स्वभावच असावा. पण, त्याच्या या मृदुतेत सृजनाचे नवोन्मेष दडलेले असतात. म्हणूनच श्रावणाच्या तुषारसिंचनात सृष्टी हिरवीगार होत असताना रानातही विविध प्रकारच्या वनौषधी बहरत असतात. आपली शेकडे मुळे जमिनीत रोवून बसलेली शतावरीची वेल हिरवीकंच होत बहरू लागते, गुळवेलीला अंगभर पानांचा बहर येतो, दिवाळीनंतर भूमिगत झालेल्या काळ्या मुसळीच्या पानांमधून पाच पाकळ्यांचे इवले पिवळे फूल डोकावू लागते, पांढऱ्या मुसळीची पाने लांब पसरू लागतात, भूईआवळा डौलात मान वर काढतो, बांबूच्या रांज्यांमध्ये लुसलुशीत बांबूचे कोंब दिसू लागतात, अग्निशिखा हे आपलं नाव सार्थ ठरवणाऱ्या कळलावीची नितांतसुंदर फुले याच महिन्यात फुलतात. रानहळदीच्या हिरव्या पानांमधून जांभळ्या गर्द पाकळ्यांचे लांबट फुलही याच महिन्यात रानात दिसू लागते. एरवी कोणत्याही आयुर्वेदिक वनस्पती रानात शोधणे कठीण असते. पण, या महिन्यात अनेक वनौषधींना पाने, फुले येतात. त्यामुळे त्यांना ओळखणे सोपे असते. या महिन्यात ऊनही हळदीसारखे पिवळेजर्द झालेले असते. ऊन, सावलीचा लपाछपीचा खेळ सुरू असतो. एखादा शिरवा सरसरत बरसला की, आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य उमलते. म्हणूनच श्रावणमास सर्वांसाठीच खास असतो.

आजाराचाही महिना
श्रावणमास आनंदाचा महिना असतो तसा आजाराचाही महिना असतो. आयुर्वेदानुसार या महिन्यात शरीरातील अग्नी मंद झालेला असतो. त्यामुळे मांसाहारी, मसालेदार, तेलकट पदार्थ एकूणच कोणतेही जड अन्न पचत नाही. उलटी, हगवण यासारखे विकार वाढतात. ढगाळ वातावरणामुळे जिवाणू, विषाणू, बुरशीला पोषण वातावरण असते. डास व कीटकांचीही भरमसाठ वाढ झालेली असते. त्यामुळे या महिन्याचा आनंद घेताना आजारांपासून दूर राहण्याचीही गरज असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT