Shriji Blocks Company Blast sakal
विदर्भ

Company Blast : झुल्लर हादरले! श्रीजी ब्लॉक्स कंपनीत स्फोट; दोघांचा मृत्यू, आठ कामगार गंभीर जखमी

झुल्लर येथील श्रीजी ब्लॉक्स प्रा. लि. कंपनीत मंगळवारी (ता.६) पहाटे साडेतीनच्या सुमारास भयंकर स्फोट होऊन कामगार दोन कामगार ठार, तर आठ जण जखमी झाले.

सकाळ वृत्तसेवा

मौदा - तालुक्यातील झुल्लर येथील श्रीजी ब्लॉक्स प्रा. लि. कंपनीत मंगळवारी (ता.६) पहाटे साडेतीनच्या सुमारास भयंकर स्फोट होऊन कामगार दोन कामगार ठार, तर आठ जण जखमी झाले. नंदकिशोर रामकृष्णा करंडे (वय ४०) मृताचे नाव असून दुपारी गंभीर जखमी ब्रम्हानंद मानगुळधे (वय ५०, रानमांगली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

श्रीजी ब्लॉक्स कंपनीत हलक्या विटांचे (लाईट ब्रिक्स) उत्पादन होते. या विटांना महाराष्ट्रासह इतर राज्यांत खूप मागणी आहे. कंपनी २४ तास सुरू असते. कंपनीत चार ऑटो क्लेव आहेत. यात विटा भाजून निघतात. पहाटे ३.३० सुमारास नंदकिशोर करंडे हे ऑटो क्लेवजवळ काम करीत होते.

इंजिनियरला यातील तांत्रिक बिघाड न समजल्याने ऑटो क्लेव्हमधील ‘व्हॉल लिकेज’ होऊन भयंकर स्फोट झाला. यामध्ये नंदकिशोरचा जागीच मृत्यू झाला. इतर नऊ कामगार जखमी झाले. स्फोट एवढा जबरदस्त होता की ऑटो क्लेव ३० फूट दूर शेजारच्या शेतात जाऊन पडले. घटनास्थळी गावकऱ्यांची गर्दी झाली. पोलिस व तहसील प्रशासनाने जखमींना नागपूर येथील दवाखान्यात दाखल केले.

हा स्फोट दिवसा झाला असता तर शेतातीतील मजूर, झुल्लर टोलीवरील मजुरांच्या जीविताचे भयंकर नुकसान झाले असते. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी, नायब तहसीलदार नवनाथ कातकडे, अपर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड, पोलिस निरीक्षक सतीशसिंग राजपूत उपस्थित होते.

मौदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात किमीवर तालुक्यातील शेवटच्या टोकावर झुल्लरजवळ श्रीजी ब्लॉक्स कंपनी दहा वर्षांपासून सुरू आहे. कंपनीत सुमारे ४० कामगार आहेत. घटनेवेळी कारखान्यात रात्रपाळीला २० कामगार होते. स्फोट एवढा जबरदस्त होता की झुल्लर गाव पूर्णपणे हादरले.

तीन शेळ्या ठार व टीनपत्रे उडाली

कंपनीतील चार लोखंडी ऑटो क्लेवपैकी सुमारे ८० फूट लांब, १२ फूट रुंद व सुमारे ३० टन वजनाचा एक ऑटो क्लेव तीस फूट दूर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शेतात जाऊन पडला. याचा वेग इतका होता की शेतातील माती व कच्च्या विटा पाचशे मिटर दूर असलेल्या झुल्लर गावाच्या टोलीत जाऊन पडल्या. त्यात तुळशीराम शेंडे यांच्या तीन शेळ्या जागीच ठार झाल्या. सुमारे सहा घरावरील टीनपत्रे उडाली. शासनाकडून अधिक भरपाई मिळेल, असे आश्वासन नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी दिले. मंडळ अधिकारी राहुल भुजाडे यांनी नुकसानीचा पंचनामा करून शासनाकडे सादर केला.

दोन कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर

नंदकिशोर रामकृष्णा करंडे यांचे कुटुंब झुल्लर येथे राहात असून कुटुंबात पत्नी प्रीती (वय ३०), मुलगा रित्विक (वय१०) व आई इंदिराबाई आहेत. घरी कमविणारे कुणीच नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. झुल्लर गावावर शोककळा पसरली आहे. नंदकिशोर यांच्या पार्थिवावर कलाडुमरी (ता.पारशिवणी) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारी तीन वाजताच्या सुमारास ब्रम्हानंद मानगुळधे (वय ५०, रानमांगली, ता.कामठी) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे, अशी माहिती आहे.

जखमी कामगारांची नावे

सुरेंद्र उमक (वय४०, झुल्लर), वंश वानखेडे (वय २१, झुल्लर), हुसेन सैय्यद (वय २३, वडोदा), स्वप्नील सोनकर (वय २४, वडोदा), सेवक कल्लूसेन (वय ४०, बालाघाट, म.प्र), गुणवंत गजभिये (वय ५०, वडोदा), रामकृष्णा विभुते (वय ४५, वडोदा), कुवरलाल भगत (वय ५०, वडोदा), अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरेंद्र उमक यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते.

एकाला ३० लाखांची मदत, दुसऱ्याला काय?

कुटुंबाचा कर्ताधर्ता नंदकिशोर रामकृष्णा करंडे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे कंपनी प्रशासनाने मदत म्हणून तीस लाख रुपये देण्याचे जाहीर केले. त्यातील १० लाख रुपये मंगळवारी दुपारी देण्याचे ठरले. उर्वरित रक्कम टप्याटप्याने देण्यात येईल, असे सांगण्यात आले. पत्नीला कंपनीमध्ये नोकरी देण्यात येईल, असे आश्वासन कंपनीने दिले. ब्रम्हानंद मानगुळधे यांचा दुपारी तीनच्या सुमारास रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना अजूनही काहीच मदत मिळालेली नाही, अशी माहिती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय दरेकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT