six year old boys rudra shendge emotional letter to the agriculture minister says these demand  sakal
विदर्भ

Washim News : रुद्र शेंडगेने लिहिले कृषीमंत्र्यांना भावनिक पत्र

वन्य प्राण्यांपासून पिकांचं रक्षण करण्यासाठी रुद्रचे वडील गेल्या अनेक दिवसांपासून शेतातच असल्याने त्याने हे पत्र लिहले.

सकाळ वृत्तसेवा

केनवड : केनवड जवळच असलेल्या मालेगाव तालुक्यातील कोळगावाच्या रुद्र विजय शेंडगे या चिमुकल्या ने चक्क कृषी मंत्र्यांना गल्ला (पिगी बँक) फोडून पार्टी देण्याची ऑफर दिलीये. वन्य प्राण्यांपासून पिकांचं रक्षण करण्यासाठी रुद्रचे वडील गेल्या अनेक दिवसांपासून शेतातच असल्याने त्याने हे पत्र लिहले.

या पत्रात कृषी मंत्री साहेब काल माझ्या पप्पा च्या मोबाईल वर पाहील की , पार्टी दिली की सरकारी लोक काम करतात मग आम्ही तुम्हाला गल्ला फोडुन त्यातील पैश्याची पार्टी देतो आमचे पप्पा पोळा झाला, लक्ष्मी झाल्या, गणपती झाले परंतु पप्पा रात्रंदिवस वावरात आहेत. मी त्यांना फोन करून विचारलं पप्पा घरी कधी येणार तर पप्पांनी सांगितलं आपल्या वावरात जंगलातील रोही, वानरे, हरीण सोयाबीन खातात त्यामुळे मी घरी येणार नाही साहेब,

तुम्हाला पार्टी देतो आमच्या वावरातील रोही वानर चा बंदोबस्त करा त्यांना आमच्या वावरात येऊ देऊ नका मग माझे पप्पा घरी येतील सरकारी लोक पार्टी घेऊन योजना देतात मग आमच्या पण सोयाबीनला भाव द्या पिक विमा द्या कर्ज पण माफ करा मी तुम्हाला साहेब पार्टी देतो माझ्या गल्यातले पैसे पप्पाच्या चोरून घेऊन तुम्हाला पार्टी देतो साहेब असे या चिमुकल्याने पत्रात लिहले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT