भंडारा : शिव मंदीर आणि नाग यांचा ऋणानुबंध भाविक आजही मानतात. नाग या प्राण्याला हिंदु संस्कृतीमध्ये देवता मानतात. गावखेडयांमध्ये नागाचीही वेगळी मंदीरे आढळतात. गायमुख या गावी मात्र गावकऱ्यांना नागासंदर्भात वेगळाच अनुभव आला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गायमुख देवस्थान येथे भोसलेकालीन शिव मंदिर असून या ठिकाणी शिवरात्रीच्या निमित्ताने भव्य यात्रा भरत असते. याच मंदिर परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाखाली नागदेवता असल्याचे गावातील एका व्यक्तीच्या स्वप्नात आले. मी (नाग) झाडाखाली आहे, म्हणून तुम्ही या ठिकाणी तेलाचा दिवा लावा असे सांगितल्यानंतर त्या व्यक्तीने गावातील इतर गावकऱ्यांना सोबत घेत त्या झाडाखाली जाऊन पाहिल्यावर खरोखरच तिथे नाग दिसून आला. गावकऱ्यांनी लगेच तिथे पूजा पाठ करणे सुरु केले आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच दूरदूरवरून नागरिकही येथे दर्शनाला गर्दी करीत आहेत.
विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धा आहे. चमत्कारावर लोकांचा अजूनही विश्वास आहे. एकीकडे कोरोना मुळे भंडारा जिल्ह्यातील यात्रा रद्द करण्यात आली असताना या ठिकाणी मात्र नागरिक गर्दी करीत आहे हे विशेष.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.