अमरावती : शहरातील रामपुरीकॅम्प परिसरातील एका घरामध्ये आंबटशौकिनांची नेहमीच वर्दळ राहते. या माहितीवरून गुरुवारी (ता. 13) रात्री कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना येथे कुणीच आढळले नाही. परंतु घराच्या झडतीत एक लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळला.
पोलिसांनी रामपुरीकॅम्पमधील ज्या घरातून गुटखा जप्त केला त्या घरात वृद्ध दाम्पत्य आणि त्यांची मध्यमवयीन सून असे तिघेजण राहतात. वृद्ध दाम्पत्याच्या विवाहित मुलाचे चार वर्षांपूर्वीच निधन झाले होते. रामपुरीकॅम्पमधील अशोकनगर मार्गावर हे तीनमजली घर आहे. तळमजल्यावर एक छोटेखानी किराणा आणि स्टेशनरीचे दुकान आहे. दुकान वृद्ध दाम्पत्य चालवितात. येथे काही दिवसांपासून आंबटशौकिनांची वर्दळ सुरू होती. परिसरातील नागरिकांनी तशी तक्रार गाडगेनगर पोलिस ठाण्यात नोंदवली. नेहमीप्रमाणे या घराभोवती गर्दी जमली. पोलिसांना सूचना मिळताच पोलिस संबंधितांना ताब्यात घेण्यासाठी तेथे पोहोचले. त्यांनी त्या घराची झडती घेतली. मात्र, तेथे कुणीच आढळले नाही. परंतु विविध कंपनीचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याची जवळपास 48 पोती (डाग) तेथे सापडली. पोलिसांनी अन्नऔषध प्रशासन विभागाला याची माहिती दिली. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन गुटख्याचा माल जप्त केला.
पोलिस त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर लपून बसलेल्या युवतीला सोडविण्यासाठी काही शस्त्रधारी युवक तेथे पोहोचले. त्यामुळे तेथे राडा झाला. तेच युवक युवतीला घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी त्या घरासमोरून दोन दुचाकी जप्त केल्या. त्यापैकी एमएच 27 सीएम 2130 क्रमांकाची दुचाकी सुनील बाबाराव काळे यांची तर, विनानंबरची दुसरी दुचाकी नागपूरच्या रवी उसराम भिसीकर यांची असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागरिकांच्या तक्रारीवरून आवश्यक कारवाई पोलिसांनी केली. तीन ते चार मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. जो संशय व्यक्त करण्यात आला, तसे येथे काहीच आढळले नाही.
- मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.