The son of a farmer became a Tehsildar 
विदर्भ

अपयशावर मात करीत शेतकरीपुत्राने गाठले यशोशिखर, नक्‍की वाचा 

अरविंद ओझलवार

उमरखेड (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त नागापूर (प.) सारख्या छोट्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या निरंजन तुकाराम कदम याने प्राथमिक, महाविद्यालयीन शिक्षण उमरखेडला घेतल्यानंतर बीफॉर्मचे शिक्षण पूर्ण केले. परंतु प्रशासकीय सेवेत जाणाची प्रचंड इच्छाशक्ती व काकांच्या प्रेरणेच्या बळावर पुण्यात यूपीएसस्सी व एमपीएसस्सीची तयारी सुरू केली. त्यानंतर सतत सहा वर्षे संघर्ष केल्यानंतर राज्यसेवेची मुख्य परीक्षा पास होऊन तहसीलदार या पदासाठी निवड झाल्याने निरंजन यांच्या संघर्षाला अखेर यशाची झालर लाभली. त्यांच्या निवडीने नागापूर गावात आनंदाची लहर पसरली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असेच निरंजनचे कर्तृत्व आहे. 

तहसीलदार पदासाठी निवड झालेल्या निरंजन कदम यांच्या आई-वडिलांचा व्यवसाय शेती असून त्यांचे काका जि.प. सदस्य चितांगराव कदम यांच्याकडून प्रशासनात येण्याची प्रेरणा मिळाली. निरंजन कदम यांचे शिक्षण पहिली ते दहावीपर्यंत साकळे विद्यालय, उमरखेड अकरावी व बारावी सायन्स गो. सी. गावंडे महाविद्यालयात तर बी फार्मा अनुराधा फार्मसी कॉलेज, चिखली जिल्हा बुलढाणा येथे झाले. त्यानंतर पुण्यात यूपीएससी व एमपीएससीची तयारी सुरू केली. 

2014 साली राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन मार्कने हुकली, मग फक्त त्याचीच तयारी केली आणि 2015 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा पास झालो. परंतु मुख्य परीक्षेत अपयश आले. मध्यंतरी आजारी पडलो आणि अभ्यास मागे पडला. संपूर्ण वर्षात एकही परीक्षा पास झालो नाही. मधल्या काळात काही पार्टटाईम जॉब केले, शिकवणी वर्ग घेतले आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली, 2017 ला MPSC च्या सर्व पूर्व परीक्षा, राज्यसेवा, STI, ASO, PSI पास झालो. परंतु, एकही मुख्य परीक्षा पास झालो नाही. पुन्हा तयारी सुरू केली, तरी अपयश आलं. मग युनिक ऍकॅडमीच्या मनोहर भोळे सरांनी मला योग्य मार्गदर्शन केले आणि मुख्य परीक्षेत मार्क्‍स वाढविण्यासाठी मदत केली. योग्य नियोजन करून 2019 ची मुख्य परीक्षा पास झालो. मुलाखतीची तयारीही मनोहर भोळे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आणि आता उशिरा का होईना, परंतु गट अ तहसीलदार हे पद मिळाले. 
असे अनुभव निरंजन कदम यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सहा वर्षे केलेल्या मेहनतीचे हे फळ 
अपयशाने खचून न जाता परिश्रमात सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळते. अपयशाने न खचता सहा वर्षे केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. तरुणांनी खचून न जाता सतत कार्यरत राहणे गरजेचे आहे. 
निरंजन कदम 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरातील तपोवन मैदानावर योगी आदित्यनाथांची आज जाहीर सभा

Winter Soup Recipe: हिवाळ्यात सकाळी नाश्त्यात प्या गरमागरम गाजर सूप! शरीर राहील उबदार, लगेच लिहा रेसिपी

Sakal Podcast: फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ते मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या

आजचे राशिभविष्य - 17 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT