soybean rate decreases in amravati 
विदर्भ

सोयाबीनचे भाव गडगडले, क्विंटलमागे तीनशे रुपयांची घसरण

कृष्णा लोखंडे

अमरावती : गेल्या आठवड्यात वधारलेले सोयाबीनचे भाव या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी कोसळलेत. ढगाळ वातावरण व पावसाची शक्‍यता बघता बाजार समितीमधील आवक मंद असतानाच भाव मात्र तब्बल तीनशे रुपये प्रती क्विंटलने घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. प्लांटधारकांनी भाव खाली आणल्याने इतक्‍यातच पुन्हा भाव वाढण्याची शक्‍यता नसल्याचा अंदाज खरेदीदारांनी वर्तविला आहे.

यंदा सोयाबीनला अती पाऊस व विविध कीडरोगांनी जोरदार फटका दिला आहे. गरजेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने उत्पादनाची सरासरी घसरण्यासोबतच प्रतही घसरली आहे. जिल्ह्यातील सात तालुक्‍यांत उत्पादनाची सरासरी हेक्‍टरी तीन ते चार क्विंटल आहे. उर्वरित तालुक्‍यातील काही भागातच शेतकऱ्यांना सरासरी बारा ते तेरा क्विंटल उत्पादन मिळाले आहे. त्यातही सुपर दर्जाचा सोयाबीन तुलनेने कमी आहे.

अमरावती बाजार समितीत गेल्या आठवड्यात हमीदरापेक्षा अधिक भाव मिळाला. सुपर दर्जाच्या सोयाबीनला प्रती क्विंटल 4,300 रुपयांपर्यंत कमाल, चार हजार रुपये किमान, तर मध्यम दर्जाच्या सोयाबीनला 3400 ते 3700 रुपये भाव मिळाला होता. या सप्ताहात सोमवारी (ता.14) पहिल्याच दिवशी हे भाव तब्बल तीनशे रुपयांनी घसरले. सोमवारी बाजार समितीत 3355 पोत्यांची आवक झाली. उत्तम दर्जाच्या सोयाबीनला सोमवारी 4 हजार ते 4265 व मध्यम दर्जाच्या सोयाबीनला 3550 ते 3850 रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. या बाजार समितीमधून छत्तीसगड, मध्य प्रदेश या प्ररप्रांतासह कोईमतूर येथील सोयाबीन प्लांट खरेदी करतात. त्यांनी या आठवड्यात भाव कमी केल्याने त्याचे परिणाम स्थानिक बाजारावर पडल्याचे अडते राजेश पाटील यांनी सांगितले.

आवक मंदावली -
दिवाळीनंतर बाजार सुरळीत झाल्यानंतर सोयाबीनची आवक वाढली होती. मध्यंतरी कामगारांच्या आंदोलनाचा आवकवर परिणाम झाला. मात्र, त्यानंतर या महिन्यात बाजार सुरळीत झाला. त्यामुळे दररोज आठ हजार पोत्यांच्या जवळपास आवक होऊ लागली होती. शनिवारपासून वातावरणातील बदलामुळे शेतकरी धास्तावलेला आहे. सोमवारी सोयाबीनची  केवळ साडेतीन हजारच्या जवळपास पोत्यांची आवक झाली. त्यामुळे बाजार लवकरच उठला.

भाव वाढण्याची शक्‍यता कमी -
यंदा सोयाबीनला लागलेले ग्रहण सुटण्याची चिन्हे नाहीत. कमी उत्पादनामुळे भाव वाढतील, अशी अपेक्षा असताना भाव पडू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोयाबीन प्लांट धारकांनी खरेदी कमी केल्याने व भाव कमी केल्याने त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर पडू लागला आहे, असे बाजार समितीमधील अडते व खरेदीदार राजेश पाटील यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT