Accident sakal
विदर्भ

Jalgaon Jamod Accident : भरधाव आयशरची मोटरसायकलला धडक; दोन ठार, एक गंभीर जखमी

आयशर गाडीच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या पल्सर आणि होंडा अशा दोन मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याची घटना रोजी निमखेडी फाट्याजवळ घडली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव जामोद - जळगाव जामोद वरून मध्य प्रदेशात इंदोरकडे जाणाऱ्या आयशर गाडीच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने आयशरणे समोरून येणाऱ्या पल्सर आणि होंडा अशा दोन मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याची घटना आज २१ सप्टेंबर रोजी निमखेडी फाट्याजवळ दुपारी घडली. या अपघातात दोन युवक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद वरून बऱ्हाणपूरकडे जाणारे आयशर क्रमांक सी.जी.०४ एन झेड ४५२५ या वाहनाचा चालक वसीम खान, राहणार महू हा इंदोरकडे जात असताना निमखेडी फाट्यानजीक पल्सर क्रमांक एमएच २८ बीआर ८४३४ व स्प्लेंडर क्रमांक एमएच २८ बी यु ७४४९ जळगावकडे येत असताना आयशरने दोन्ही दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेमध्ये पल्सरवर स्वार शाहरुख नजीर तडवी (३०), इब्राहीम मस्तान (३६) हे दोघे जागीच ठार झाले. तर स्प्लेंडर वरील स्वार आसिफ हुसेन तडवी (३७) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलविण्यात आले आहे. वृत्तलेखन पर्यंत पोलीस स्टेशन जळगावला गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT