Sujata Patil sakal
विदर्भ

SSC Exam Result : ६० वर्षाच्या आजीने मिळविले चक्क ६० टक्के गुण

सुजाता पाटील यांनी वयाच्या ६० व्या वर्षी दहावी परीक्षा दिली आणि घवघवीत यश देखील मिळवले.

सकाळ वृत्तसेवा

शितलवाडी - शिक्षण आणि वयाचा तसा फारसा संबंध नसतो. जीवनात राहून गेलेले शिक्षण पूर्ण करुन समाधान प्राप्त करुन घेण्याच्या इच्छेने परीक्षा देणाऱ्या साठ वर्षीय आजीने दहावी परीक्षेत चक्क ६० टक्के गुण प्राप्त केले आहे.

तालुक्यातील कांद्री माईन येथील सुजाता पाटील यांनी वयाच्या ६० व्या वर्षी दहावी परीक्षा दिली आणि घवघवीत यश देखील मिळवले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. त्यांनी हे काम करत असताना दहावी उत्तीर्ण होण्याचा निर्णय घेतला. दररोज शाळेत जाणे शक्य होत नसल्याने १७ नंबरचा फॉर्म भरला.

त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. घरातील कामाची जबाबदारी आणि अंगणवाडी सेविका म्हणून असलेली कामे, अशी दुहेरी कसरत करीत दिवसरात्र अभ्यास केला. घरातील मंडळींनी त्यांना चांगले सहकार्य केले. याचेच फलित म्हणून सुजाता पाटील (रा.कांद्री) या आजींना चक्क ६० टक्के गुण मिळविले. यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या निकालापेक्षा या निकालाची चर्चा जास्त प्रमाणात झाली . प्रकाश हायस्कूल कान्द्री-माईनचा निकाल ८८.४६ टक्के इतका लागला.

विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल ग्रामहित शिक्षण संस्थेचे डॉ. राजेंद्र दखणे व संस्थेचे सचिव डॉ. रश्मी दखणे यांनी अभिनंदन व शुभेच्छा देत निकालावर समाधान व्यक्त केले. इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर आपण कोणत्याही वयात यशाला गवसणी घालू शकतो, असा संदेश या माध्यमातून त्यांनी दिला आहे. शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी आदिवासीबहुल भागातील शाळेतील प्रगतीचे कौतुक केले.

मुकद्दम प्रथम, तर डडोरे द्वितीय

शितलवाडीःरामटेक तालुक्यामधून राष्ट्रीय आदर्श विद्यालयातील सर्वज्ञा मुकद्दम हिने ९७.८४टक्के टक्के गुण मिळवून प्रथम, तर श्रीराम विद्यालयातील क्रिष्णा डडोरे याने ९६टक्के टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकविला आहे .तिसऱ्या स्थानावर समर्थ विद्यालयाचा उत्कर्ष केशव कावळे याने ९५.६० टक्के गुण घेतलेले आहे.

शहरातील समर्थ विद्यालयाचा उत्कर्ष कावळे प्रथम, द्वितीय तनवी कावडकर, तर तृतीय क्रमांक समिश्रा टिपले हिने पटकविला आहे. समर्थ काँव्हेंटमधून कृतीका सहारे ही प्रथम आली आहे. श्रीराम कनिष्ठ विद्यालयातून प्रथम क्रिष्णा डडोरे, द्वितीय अवेश हमीद शेख, तृतीय भावेश बरबटे, तथा आर्यन अहिकर याने चौथा क्रमांक मिळविला आहे.

श्रीराम कन्या विद्यालयातील जान्हवी क्षीरसागर प्रथम, द्वितीय मेघना आटबैले, प्रिती मोटघरे तृतीय आली आहे. ज्ञानदिप कॉव्हेंटचे तन्मेय दारोडे प्रथम, द्वितीय इंद्रजित गुप्ता, तर पूर्वा जयंत सावरकर हिने पटकविला आहे. श्रीराम विद्यालय ८८.४६ टक्के, राष्ट्रीय आदर्श ९८, ज्ञानदिप काँव्हेंट ९४.४० टक्के ,श्रीराम कन्या विद्यालय९४.५९ टक्के, समर्थ विद्यालय ९१.५३ टक्के निकाल लागलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICSE, ISC Exam Schedule: दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 'असं' डाऊनलोड करा

Vaibhav Suryavanshi IPL Auction: नावातच 'वैभव'! १३ व्या वर्षी सूर्यवंशी झाला करोडपती; द्रविडच्या मार्गदर्शनाखाली RR कडून खेळणार

Car Accident : इंदापूरजवळ कारच्या अपघातात शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे गंभीर जखमी

IPL Auction 2025: कोण आहे गुरजपनीत सिंग, ज्याच्यासाठी CSK ने ३० लाखापेक्षा ७ पटीने पैसे ओतत कोट्यवधी रुपयांना केलं खरेदी

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT