House Collapse by Stormy Rain sakal
विदर्भ

Stormy Rain : नरखेड तालुक्यात वादळी पाऊस; गारपिटीमुळे शेकडो घरांचे नुकसान, विद्युत खांबही कोसळले

जलालखेडा, मदना, देवग्राम, नांदनी, पेठ मुक्तापूर व आजूबाजूच्या गावात तसेच गारपिटीमुळे शेकडो घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा - नरखेड तालुक्यातील शुक्रवारी (ता.७), सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आला. जलालखेडा, मदना, देवग्राम, नांदनी, पेठ मुक्तापूर व आजूबाजूच्या गावात तसेच गारपिटीमुळे शेकडो घरांचे मोठे नुकसान झाले आहे. संत्रा, मोसंबीची झाडे जमीनदोस्त झाली. मदना गावाला फटका बसला असून येथील ९० घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील जलालखेडा, देवग्राम, नांदनी येथील घरांवरील छत उडाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मदना येथील झाडे कोसळली, घरावरील टिना उडाल्या, भिंती कोसळल्या, छत उडाले असल्यामुळे पावसाने घरातील सर्व साहित्य खराब झाले. घरातील अन्नधान्य पावसामुळे खराब झाल्यामुळे ग्रामस्थांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात विद्युत खांब पडले. यामुळे विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. झाड कोसळल्याने अशोक वानखडे यांच्या गाईचा मृत्यू झाला.

कामगारांच्या झोपडीवर झाड कोसळले. यात तो जखमी झाला.तर दोघे थोडक्यात बचावले. वाऱ्यामुळे घरावरील छत हवेत उडाले. झाड दुचाकीवर पडल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले. मदना येथील विद्युत प्रवाह दोन दिवस खंडित राहण्याची शक्यता आहे.

नुकसानीची पाहणी सरपंच रूपराव हरणे, राजेंद्र हरणे, सभापती महेंद्र गजबे, नायब तहसीलदार रामकृष्ण जंगले, तलाठी अनिल पाचपिल्ले, सागर कठाणे, भास्कर कुटे, भाग्यश्री दोडके, सचिव मुकुंद भोयर, अनिल इंगोले यांनी केली. शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी राजेंद्र हरणे यांनी केली आहे.

कंपनीने दाखवली माणुसकी

वादळी वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे रस्त्यावर, गावात, घरावर कोसळली. त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. तसेच गावातील रस्ता बंद झाला होता. घराचे मोठे नुकसान झाले होते. कंपनीचे इंजिनिअर दिपांशू राय, मोहन चौहान, पवन कळंबे यांनी शासनाची मदत पोचण्यापूर्वी जेसीबी पाठवून रस्त्यावरचे झाडे बाजूला करून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.

मदना येथील ९० घरांचे मोठे नुकसान झाले. घरावरील छत उडाले, घरावर झाडे कोसळली. संत्र्याची झाडे उन्मळून पडली. शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी.

- राजेंद्र हरणे, माजी जिल्हा अध्यक्ष शिवसेना ( ठाकरे गट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT