यवतमाळ : इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यात. त्यानुसार दीर्घ कालावधीनंतर सोमवारी जिल्ह्यातील जवळपास 645 शाळा उघडण्यात आल्या. तपासणीत 81 शिक्षकच कोविड पॉझिटिव्ह निघाल्याने पहिल्या दिवशी शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी प्रमाणात दिसून आली.
जिल्ह्यात 3 हजार 397 शिक्षकांची संख्या असून 2 हजार 600 शिक्षकांची आरटीपीसीआर व ऍन्टिजन तपासणी करण्यात आली. त्यात 81 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. अजूनही पाचशे शिक्षकांची तपासणी व्हायची आहे. त्यातही पॉझिटिव्ह शिक्षक निघाल्यास आकडा आणखी फुगण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात ठेवून आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा याबाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. शाळेमध्ये सॅनिटायझर, पल्स मिटर, सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात आले. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. जिल्ह्यात नगर परिषद, जिल्हा परिषद, शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित 771 शाळा असून वर्गखोल्या 3 हजार 855 आहे. एकूण शिक्षकांची संख्या 3 हजार 397 आहे. इयत्ता नववी व दहावीची एकूण विद्यार्थी संख्या 89 हजार 988 आणि अकरावी व बारावीची एकूण विद्यार्थी संख्या 59हजार 797 आहेत.
शिक्षक कोविड पॉझिटिव्ह निघाल्याने पालकांच्या ह्रदयाचे ठोके वाढले आहेत. परिणामी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी प्रमाणात होती.
45 टक्के पालकांचे संमतीपत्र -
विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवण्यासाठी पालकांचे संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. पालकांची संमती असेल तरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. 45 टक्के पालकांनीच संमतीपत्र लिहून दिले. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बहुतांश पालकांनी संमतीपत्राकडे पाठ फिरविली आहे.
हेही वाचा - राष्ट्रसंतांच्या प्रार्थना मंदिराचा मुद्दा तापला, निर्णय मागे न घेतल्यास गुरुदेव भक्तांचा...
शासनाच्या आदेशानुसार सर्व प्रकारची खबरदारी घेत शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची कमी प्रमाणात हजेरी दिसून आली. आतापर्यंत 45 टक्के पालकांनी संमतीपत्र लिहून दिले आहे. 81 शिक्षक कोविड पॉझिटिव्ह निघाले आहेत. अजूनही जवळपास पाचशे शिक्षकांच्या तपासण्या व्हायच्या आहेत.
-दीपक चवणे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, यवतमाळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.