Vaishnavi Rathod 
विदर्भ

NEET Exam : पापणीत अश्रू, उरात अभिमान साठवून वैष्णवीची 'नीट' परिक्षेत गगनभरारी; 720 पैकी 700 गुण

सकाळ डिजिटल टीम

महागाव : बारा वर्षापूर्वी एका रस्ता अपघातात वडीलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पितृछत्र हरवल्याने शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. खेडेगावात शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणुन अडीचशे कि.मी अंतरावर मामाच्या घरी जाऊन तिने प्रयत्नांची पराकाष्टा केली, आणि एका तपाच्या या परिश्रमाला आज यशाची पालवी फुटली. (Latest Marathi News)

महागाव तालुक्यातील पोखरी (इजारा) येथील वैष्णवी रोहिदास राठोड या विद्यार्थिनीने अखिल भारतीय प्री मेडिकल प्रवेश परिक्षेत (NEET Exam) ७२० पैकी ७०० गुण मिळवून एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. ऑल इंडिया रँक मध्ये तिला २३० वा क्रमांक आहे, तर ऑल इंडिया ओबीसी ग्रुप मध्ये ती ४४ क्रमांकावर आहे. (Marathi Tajya Batmya)

तिच्या या गगनचुंबी यशाने महागाव तालुक्यच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. पोखरी या बंजारा बहुल गावाची रहिवाशी असलेली ही सावित्रीची लेक एका क्षणात देशभरात आयकॉन ठरली असली तरी यशाच्या वाटेवरील तिचा काटेरी प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे. वैष्णवीचे वडील रोहिदास राठोड यांचा २०११ मध्ये मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला. या धक्क्याने कुटुंब उद्धवस्त झाले. वैष्णवीची आई सुनिता ही गृहिणी आहे. मोठी बहिण अश्विनी आणि वैष्णवी ह्या दोघीही शिक्षणात अत्यंत तल्लख.

वडीलांचा आधार गेल्यामुळे अनाथ झालेल्या मुलींना मामा शंकर बळीराम जाधव यांनी सहारा दिला. ते चंद्रपूर येथे महाजेनको मध्ये कार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. दोन्ही भाच्यांची त्यांनी जबाबदारी उचलली. थोरली बहिण अश्विनी सुद्धा नीट परिक्षेत चमकली होती.

एमबीबीएसचा प्रवेश थोड्या गुणांनी हुकल्यामुळे ती बीएएमएस करीत आहे. वैष्णवीने मात्र कठोर परिश्रम करून देदिप्यमान यश संपादन केले. चंद्रपूर येथील जयहिंद कनिष्ठ महाविद्यालयात ती शिकत होती. कुठल्याही शिकवणी वर्गाशिवाय केवळ शाळेत तयारी करून तिने हे अभूतपूर्व यश मिळविले. पितृछत्र गमावल्यानंतरही वैषणवीने चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर यश मिळविले. तिच्या या यशामुळे आमच्या पापणीत अश्रू आणि उरात अभिमान असल्याची प्रतिक्रिया मामा शंकर जाधव यांनी दिली.

वैष्णवीला व्हायचं कार्डिओलॉजिस्ट

अभ्यासातील सातत्य, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई,मोठी बहीण व मामांच्या प्रोत्साहनामुळे यशाला गवसनी घालता आली असे मनोगत वैष्णवी ने व्यक्त केले. एमबीबीएस अभ्यासक्रमानंतर एमडी हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून कार्डियालॉजिस्ट किंवा यूरोलॉजिस्ट होणार असल्याचा मनोदय तिने सकाळ सोबत बोलताना व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT