विदर्भ

Breaking : वर्धेच्या बँकेत शिरला सुसाईड बॉम्बर! केली पैशांची मागणी

रूपेश खैरी

वर्धा : दिवस शुक्रवारचा... नेहमीप्रमाणात शहरात वर्दळ होती. बॅंकही सुरू होती. बॅंकेत नागरिकांची गर्दी होती. नागरिकांचे व्यवहार सुरू असतानाच एक जण बॅंकेत शिरला. त्याने अंगाला बाँम्ब लावला होता. त्याला पाहून नागरिकांची पळापळ सुरू झाली. अंगाला बाँम्ब (Suicide bomber) लावल्याचे पाहून नागरिक घाबरून गेले (Citizens panicked) आणि इकडेतिकडे पळू लागले. अशात सुसाईड बॉम्बर बनून आलेल्या व्यक्तीने धमकीपत्र देऊन पैशांची मागणी (Demanding money by threatening) केली. योगेश कुबडे असे सुसाईड बॉम्बरचे नाव आहे. (suicide-bomber-entered-in-Wardha-district-bank)

वर्धा येथील सेवाग्राम पोलिस ठाण्यासमोरच सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे. या बँकेत तोंडाला कापड गुंडाळून आलेल्या इसमाने बँक शिपायाच्या डोक्यावर एअर पिस्तूल लावून धमकी देत पैशांची मागणी केली. पुढे त्याला घेऊन येत पिस्तूल लपवून ठेवली अन् पत्र त्याला दिले. शिपायाने ते पत्र बँकेच्या अधिकाऱ्याला दिले. बँकेच्या व्यवस्थापकांनी तक्रार समजून पत्र वाचले. त्यातील मजकूर वाचून अधिकाऱ्याला धक्काच बसला.

पत्रात आजारावर उपचारासाठी ५५ लाखांची गरज आहे. मी सुसाईड बॉम्बर आहे. बँकेत येताच बॉम्ब अ‍ॅक्टीव्ह केलेला आहे. सिक्युरिटी अलार्म वाजवला किंवा पोलिसांना बोलावू नका, अन्यथा सर्वांना उडवून देईल, अशी धमकी लिहिली होती. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी समयसूचकता दाखवत पोलिसांना सुसाईड बॉम्बर शिरल्याची माहिती दिली.

बँकेत सुसाईड बॉम्बर शिरल्याची माहिती मिळताच पोलिस कर्मचाऱ्यांनी बँकेकडे धाव घेतली. पोलिसांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर योगेश कुबडे याने पळून जाण्याच्या प्रयत्न केला. पोलिसांनी कुठलाही वेळ न दवडता योगेशला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडील कमरलेला गुंडाळलेले बनावट बॉम्ब सदृष्य साहित्य, चाकू, एअर पिस्टल जप्त केले.

ऑनलाइन बोलावली पिस्तूल

कमरेला गुंडाळलेल्या सहा लालसर रंगाच्या पाइपच्या कांड्या, वायर, छोटी डिजिटल वॉच जोडलेली बॉम्ब सदृश्य दिसेल असे तयार केले होते. त्यात विस्फोटक नव्हते. प्लॅस्टिकच्या पाइपमध्ये पीओपी भरले होते. पाहणाऱ्यांना ते बॉम्बसदृष्य दिसत होते. त्याने बनावट पिस्तूल ऑनलाइन बोलावल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

उपचारासाठी रचला प्लान

वर्धेच्या सेवाग्रामस्थित बँकेत एकाने बनावट सुसाईड बॉम्बर बनून प्रवेश केला. यानंतर धमकीचे पत्र देऊन पैशांची मागणी केली. आजारावर उपचारासाठी ५५ लाखांची गरज आहे. पैसे न दिल्यास सर्वांना संपवण्याची धमकी पत्रातून दिली होती.

(suicide-bomber-entered-in-Wardha-district-bank)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT