Suicide sakal
विदर्भ

दिल्लीच्या डॉक्टरला दोन कोटींने गंडविणार्‍या तरुणाची आत्महत्या

पोलिस वर्तुळातही खळबळ; काही दिवसांपूर्वीच आला होता कारागृहातून बाहेर

सूरज पाटील

यवतमाळ : सोशल मीडियावर तरुणी असल्याचा बनाव निर्माण करून दिल्ली येथील डॉक्टरला दोन कोटी रुपयांनी गंडा घालणार्‍या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता.21) दुपारी दारव्हा मार्गावरील जसराणा अपार्टमेंटमध्ये घडली.

संदेश अनिल मानकर (वय 22, रा. यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. गेल्या महिन्यात सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीच्या डॉक्टरला दोन लाखांने गंडा घातल्याप्रकरणी अटक केली होती. त्याच्याकडून एक कोटी 74 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. कारागृहातून नुकताच संदेश बाहेर आला होता. तेव्हापासून दारव्हा मार्गावरील जसराणा अपार्टमेंटमध्ये महिला नातेवाइकाकडे राहायचा.

अटक होण्यापूर्वी त्याचे वास्तव्य अरुणोदय सोसायटीत होते. त्याची नातेवाईक महिला वर्धेला गेल्याने अपार्टमेंटमधील घरी कुणीही नव्हते. नेमकी हीच संधी साधून त्याने काळ्या प्लॅस्टिकच्या प्न्नया डोक्यात घातल्या. सिलिंडरमधील गॅस आतमध्ये सोडला. यातच गुदमरून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलिसांसह अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ‘हनी ट्रॅप’साठी एकट्यानेच समर, बहीण, तरुणीची सारे पात्रे रंगविली होती. संदेश हा अतिशय चाणाक्ष होता. समोरच्या व्यक्तीला नेमके काय हवे, एकूणच माणसाला ‘स्कॅन’करायचा. या घटनेने पोलिस वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

असा केला होता बनाव

आपण खूब गर्भश्रीमंत आहोत. विदेशात अमाप संपत्ती आहे. डॉक्टरही त्याच्या फेसबूक, इंस्टाग्राम व व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅटींगला भाळले. दरम्यान, दुबईला लहान बहिणीचे अपरहण झाले आहे, तिला वाचवायचे आहे. दोन कोटींची आवश्यकता आहे, असे खोटे सांगून रक्कमेची मागणी केली. डॉक्टरनेही त्याच्यावर अर्थात अनन्नया ओबेरॉयवर विश्वास ठेवून दोन कोटी रुपये यवतमाळात येऊन ‘समर’च्या हवाली केले होते. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरने पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली. त्यानंतर अवघ्या काही तासांत संदेश पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता.

...तर तेव्हाच झाला असता ‘गेम’

संदेशकडे दोन कोटी रुपये आल्यानंतर त्याच्या वागणुकीत काहीच फरक पडला नाही. त्याने कुणालाही गंडा घातल्याची साधी भनक लागू दिली नव्हती. त्याच्याकडे कोट्यवधी रुपये असल्याची माहिती लिक झाली असती, तर तेव्हाच त्याचा गेम झाला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT