Superintendent of Police gives ultimatum to criminals in yavatmal  
विदर्भ

"मेरा जमीर अब भी जिंदा है" असं म्हणत पोलिस अधीक्षकांनी गुन्हेगारांना दिला अल्टिमेटम

सूरज पाटील

यवतमाळ : अडीच महिन्यांपूर्वी पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. त्याचवेळी अवैध व्यवसाय चालणार नाहीत, असे ठणकावून सांगितले. त्यावर काहींनी दोन महिन्यांची हवा दिली होती. मात्र, अवैध व्यावसायिकांसह कुणाचीही गय केली जाणार नाही, ‘मेरा जमीर अब भी जिंदा है’, अशा शब्दांत पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली.

येथील पोलिस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. भुजबळ बोलत होते. भ्रष्टाचारमुक्तीसाठी जनतेसोबत संवाद आवश्यक आहे. जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेची हमी पोलिसांची आहे. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात असल्याचा दावा पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी केला. पोलिस ठाण्यात येणार्‍या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जावी, गुन्हा दाखल करून तपास करावा, गुन्हा बर्ग होणार नाही, यावर फोकस असल्याचेही पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ म्हणाले. 

रस्ते अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी अपघातप्रवण स्थळांची दुरुस्ती, सुधारणा करण्यात येत आहे. रस्तासुरक्षा सप्ताहात वर्षभराचे नियोजन करण्यात येणार आहे. अवैध धंद्याचे चालक, मालक कुणीही असले तरी आज ते दहशतीत आहेत. पोलिस खात्याची प्रतिमा आता डागाळली जाऊ नये, माहिती जनतेपर्यंत जावी, यासाठी जनसंपर्क अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

बदलून गेलेल्यांचा आत्मा जिल्ह्यातच

मागील काही दिवसांपासून पोलिस खात्याची प्रतिमा डागाळली जावी, यासाठी खोडसाळपणा करण्यात येत आहे. एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकलेल्या अधिकार्‍याची बदली झाल्यावरही ते जिल्ह्यातच ठाण मांडून राहतात. सर्व बाबी अवैध धंद्यांशी संबंधित आहेत. चाबी चोरी प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यातील तथ्य बाहेर येईलच. बदलून गेलेल्यांचा आत्मा जिल्ह्यातच भटकत आहे, असा उपरोधीक टोला कुणाचेही नाव न घेता पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी लगावला

संशयित, फिर्यादी, तपास अधिकारी पोलिसच

पोलिस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानातील चंदन वृक्षांची चोरी 2018 मध्ये झाली होती. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दीड महिन्यापूर्वी सपोनि राहुलकुमार राऊत यांचे सर्व्हिस पिस्टल चोरीला गेले होते. आता, पोलिस अधीक्षक कार्यालयातून चाव्यांच्या गुच्छावर चोरट्याने हात साफ केला. अलीकडे घडलेल्या दोन्ही प्रकरणात संशयित, फिर्यादी व तपास अधिकारी पोलिसच आहेत. अशा घटना पोलिस दलात घडतात, याबद्दल पोलिस अधीक्षकांनी तीव्र शब्दांत नाराजीही व्यक्त केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT