Yavatmal Campaign sakal
विदर्भ

Yavatmal Campaign : खबरदार..! आता शिव्या द्याल तर....राज्यातील सहा विद्यापीठांत ‘शिव्यामुक्ती’ची चळवळ

Yavatmal Campaign : राज्यातील सहा विद्यापीठांमध्ये 'शिव्यामुक्त समाज अभियान' सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे शिव्यांचा वापर रोखण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. या अभियानामुळे स्त्रियांचा आदर वाढेल आणि लैंगिक अत्याचार कमी होतील, असा विश्वास संयोजकांचा आहे.

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : रागाच्या भरामध्ये अथवा भांडणादरम्यान परस्परांना आई-बहिणीवरून शिव्याची लाखोली वाहिली जाते. अनेकदा किरकोळ शिवी देखील एखाद्या मोठ्या गुन्ह्याला जन्म देऊ शकते. स्थलकालपरत्वे शिव्यांचे स्वरूप बदलत जाते पण त्यांचा विषारीपणा कायम राहतो.

शिव्यांमुळे स्त्रियांचा अवमान तर होतोच पण त्यामुळे विखारही वाढतो. आता हाच शिव्यांचा प्रसार रोखण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील उच्चपदस्थ मंडळी सरसावली आहेत. त्यासाठी ‘शिव्यामुक्त समाज अभियान’ सुरू करण्यात आले.

विशेष म्हणजे, या अभियानाची दखल घेत राज्यातील तब्बल सहा विद्यापीठांनी ‘शिव्या बंदी’चे परिपत्रक जारी केले आहे. या अनोख्या चळवळीला विदर्भातून सुरुवात झाली, हे विशेष.

खबरदार..! आता शिव्या द्याल तर

अमरावती येथील प्रा. डॉ. अंबादास मोहिते यांनी जुलै महिन्यात या अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आपल्या विविध विभागांसह संलग्न महाविद्यालयांसाठी ‘शिव्या बंदी’चे परिपत्रक जारी केले.

आता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानेही ‘शिव्या बंदी’ची अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्यातील जवळपास ४० समाजकार्य महाविद्यालयांनीही शिव्यामुक्त समाज अभियानात सहभाग नोंदविला आहे.

या विद्यापीठांच्या कुलगुरूंनी विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून याबाबतची परिपत्रके जारी केली आहेत.

सर्व कार्यालयांत शिव्याबंदी हवी

विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आई-बहिणीवरून शिव्या दिल्यास किंवा कोणत्याही अश्‍लाघ्य शब्दांचा वापर केल्यास कठोर कारवाई करण्याची तंबी या परिपत्रकातून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही ‘शिव्या बंदी’ शासनाच्या सर्व कार्यालयांप्रमाणेच खासगी कार्यालयांमध्येही लागू करण्यात यावी, सार्वजनिक ठिकाणीही ‘शिव्या बंदी’ करावी यासाठी चळवळीचे संयोजक प्रा. डॉ. अंबादास मोहिते यांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री आणि राज्यपालांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. त्याची दखल घेत अमरावतीच्या पोलिस महानिरीक्षकांनी विभागातील पाचही जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठविल्याची माहिती मोहिते यांनी दिली.

विद्यापीठांचे निर्देश

  • विद्यापीठे, महाविद्यालयांत शिव्यांवर बंदी, स्त्रीत्वाबाबत अपशब्द नको

  • शिव्या देणारे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करा

  • स्त्री - पुरुषांच्या जननेंद्रियांचा उल्लेख असलेल्या शिव्यांवर बंदी असल्याचे फलक लावा

  • ‘शिव्यामुक्त समाज’ या विषयावर चर्चासत्र, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करा

  • महाविद्यालयातील कार्यक्रमात सर्वांनी शिव्यामुक्त समाजासाठी कार्यरत राहण्याची शपथ घ्यावी

बदलापूर प्रकरणात न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण व वर्तमान परिस्थिती विचारात घेता या अभियानाचे महत्त्व अधोरेखित होते.कारण स्त्रियांचा आदर करण्याचे बाळकडू मिळाले तर नक्कीच लैंगिक अत्याचार कमी होतील. नारीद्वेषमूलक शिव्या स्त्रियांकडे समाज कसा पाहतो? हे दर्शवितात त्यामुळे शिव्यांचे उच्चाटन गरजेचे आहे.

- प्रा. अंबादास मोहिते, संयोजक, शिव्यामुक्त समाज अभियान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: अगं बाळे, घाबरून कसं चालेल? लेकीच्या काळजीने अजितदादा कसे गलबलले; सुनेत्रा पवारांनी सांगितला अनुभव

Latest Maharashtra News Updates : शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर राज ठाकरे यांच्या भेटीला

Ola Electric Stock Crash: ओला इलेक्ट्रिकला मोठा झटका! शेअर उच्चांकावरून निम्म्यावर घसरला, काय कारण आहे?

संकटासमोर सलमान पाय रोवून... सीमा सजदेहने केलं दीराचं कौतुक, म्हणाली- मलायकाच्या वडिलांच्या निधनावेळी तो

Congress Candidates: विधानसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, विद्यमान आमदाराचे कापले तिकीट; जाणून घ्या कुणाला मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT