गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात दोन वाघाच्या झालेल्या झुंजीत टी-९ या नर वाघाचा मृत्यू झाल्याची घटना आज २२ सप्टेंबर रोजी नागझिरा -१ कक्ष क्रमांक ९६ मध्ये मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात आज, सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
नवेगाव- नागझिरा अभयारण्यात वाघाच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान, आपल्या अस्तित्वासाठी या वाघांची झुंज सुरू झाल्याचे आजच्या घटनेवरून दिसून येत आहे. आज रविवारी वनपरिक्षेत्र नागझिरा अभयारण्य अंतर्गत सहवनक्षेत्र नागझिरा संकुल, नियत क्षेत्र नागझिरा १, कक्ष क्र. ९६ मधील मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात बिटरक्षक जे. एस. केंद्रे हे आपल्या चमुसह नियमीत गस्ती वर असताना साधारणतः सकाळी १० वाजताच्या सुमारास एक नर वाघ अंदाजे वय वर्षे १ ते १० मृत अवस्थेत दिसून आला.
सदर घटनेबाबत माहिती बिटरक्षक केंद्रे यांनी तात्काळ वरिष्ठ वनअधिकारी यांना कळविली. घटनेची माहिती प्राप्त होताच नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक जयरामे गौडा आर. , नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, साकोलीचे उपसंचालक राहुल गवई, सहाय्यक वनसंरक्षक, (अति.कार्य.) एम.एस.चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एम. भोसले,
घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभुत कार्यपध्दतीनुसार गठीत समितीद्वारे घटनास्थळ परिसराची व मृत वाघाची पाहणी करण्यात आली. सदर समितीमध्ये यावेळी मानद वन्यजीव रक्षक तथा प्रतिनिधी मुख्य वन्यजीव रक्षक सावन बहेकार,
NTCA प्रतिनिधी रुपेश निंबार्ते, NGO प्रतिनिधी छत्रपाल चौधरी, डॉ शितल वानखेडे, डॉ. सौरभ कवठे, डॉ. समिर शेंद्रे, डॉ. उज्वल बावनथडे, पशुवैद्यकिय अधिकारी यांचा समावेश होता. पुढील तपास नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालक राहुल गवई, यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. भोसले करीत आहेत.
पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांचे चमुद्वारे समिती सदस्यांचे उपस्थितीत मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले व वाघाचे व्हिसेरा सॅम्पल उत्तरीय तपासणी करीता संकलित करण्यात आले आहेत.
मृत नर वाघ हा T-9 असून आपसी झुंजीमध्ये गंभीररित्या जखमी होऊन मृत्युमुखी पडला असवा असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकिय अधिकारी यांनी वर्तविलेला आहे. मृत वाघाचे सर्व अवयव साबुत अवस्थेत आढळून आलेले असून शवविच्छेदानंतर वाघाचे पंचासमक्ष दहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.