Chandrapur school  sakal
विदर्भ

Chandrapur : विद्यार्थ्यांना मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा...व्याहाड शाळेतील शिक्षिकेच्या पाणी बाँटलमध्ये दारू टाकल्याचा संशय

सकाळ वृत्तसेवा

व्याहाड खुर्द (जि. चंद्रपूर) : येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षिकेने सातव्या वर्गातील आठ विद्यार्थ्यांना मारहाण केली. यातील दोन विद्यार्थ्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत दारू मिसळवल्याच्या संशयावरून शिक्षिकेने या विद्यार्थ्यांना मारहाण केली. ही घटना शनिवार (ता. २८) घडली असून, शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाला आहे.व्याहाड खुर्द येथे जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. शनिवार (ता. २८)

विद्यार्थ्यांना मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा

नेहमीप्रमाणे शाळा भरली. शिक्षकांनी आपापल्या वर्गावर जाऊन शिकविण्यास सुरवात केली. दुपार एकच्या सुमारास इंग्रजी विषयाच्या शिक्षिका उज्ज्वला पाटील सातव्या वर्गात शिकविण्यास गेल्या. त्यांनी पाणी पिण्याकरिता स्वतःची बाटली सोबत आणली होती. शिकवत असतानाच त्यातून पाणी पीत असताना त्यांना बाटलीमधून दारूचा वास आला.

त्यामुळे बाटलीमधील पाण्यात कुणीतरी दारू मिसळवल्याचा त्यांचा समज झाला. यातून त्यांनी वर्गात उपस्थित असलेल्या एकूण १९ विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली. मात्र, यात काहीच आढळले नाही. यामुळे संतापून त्यांनी आठ विद्यार्थ्यांना मारहाण केली. यात दोन विद्यार्थ्यांना जबर दुखापत झाली. त्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पालक शाळेत दाखल झाले. यामुळे एकच गोंधळ उडाला. पालकांनी घटनेची माहिती पालकांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखही आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. विस्तार अधिकारी किशोर बारसागडे, केंद्र प्रमुख किशोर येनगंटीवार यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्याकरिता वरिष्ठांकडे अहवाल पाठविला. यानंतर ठाणेदारांनी शिक्षिका पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आमच्या मुलांनी असे कुठलेही काम केले नाही. तरीही शिक्षिकेने त्यांना प्रेमात विचारणे अपेक्षित होते. एक वेळ शिक्षा केली तर मान्य होईल. परंतु, दुखापत होईल अशी शिक्षा करणे योग्य नाही. अशा घटना पुन्हा घडू नये.

- हरिदास दहेलकर, राहुल रायपुरे, पालक

पाणी पिण्याच्या बाटलीमध्ये दारू टाकण्यात आल्याचे मला विद्यार्थ्यांकडूनच माहीत झाले. मला त्या विद्यार्थ्यांची नावे ठाऊक आहेत. त्यांना शिक्षा म्हणून मारले. ही घटना माझ्यासोबत तिसऱ्यांदा घडली.

- उज्ज्वला पाटील, सहायक शिक्षिका

पाणी पिण्याच्या बाटलीमध्ये दारू टाकण्यात आल्याचे मला विद्यार्थ्यांकडूनच माहीत झाले. मला त्या विद्यार्थ्यांची नावे ठाऊक आहेत. त्यांना शिक्षा म्हणून मारले. ही घटना माझ्यासोबत तिसऱ्यांदा घडली.

- उज्ज्वला पाटील, सहायक शिक्षिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Metro Inauguration: नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो आणि राज्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न

नवीन योजनांमुळे महाराष्ट्र सरकार आर्थिक संकटात, वित्त विभागाच्या  विरोधानंतरही निर्णय!

Jalgaon Rain Update: जिल्ह्यातील ‘मान्सून’ला सोमवारपासून लागणार ब्रेक! अतिपावसापासून दिलासा; एक आक्टोबरपासून तापमानात होणार वाढ

Sharad Pawar: इंदापूरचा भावी आमदार कोण? शरद पवार याचं सूचक विधान

Nilesh Lanke: फोटो काढण्यासाठी थांबवलं अन्...निलेश लंकेंनी कशी करुन दिली अमित शाहांना नवीन खासदारांची ओळख? वाचा मजेदार किस्सा

SCROLL FOR NEXT