File Photo 
विदर्भ

Sad story : ७० वर्षीय आजोबांची सहा महिन्यांपासून भ्रमंती अन् पाणावले डोळे

सूरज पाटील

यवतमाळ : पत्नी आणि मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वृद्धाची मानसिकता बिघडली (The mentality of the elderly deteriorated). याच अवस्थेत थेट मध्य प्रदेशातून यवतमाळपर्यंतचा प्रवास (Journey from Madhya Pradesh to Yavatmal) झाला. सहा महिन्यांपासून भ्रमंती सुरू असताना खाकी वर्दीतील संवेदनशील माणसे मदतीला धावून आलीत. वृद्घाच्या नातवाचा शोध घेऊन घर शोधून दिले. सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आजोबाला बघून नातवाला अश्रू (Tears came to the grandson when he saw his grandfather) रोखता आले नाहीत. (Tears-in-the-grandson's-eyes-when-he-saw-his-grandfather-in-Yavatmal-district)

उदयसिंग गुलाबसिंग राजपूत (वय ७०) असे आजोबांचे नाव आहे. ते मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यात येणाऱ्या गडीबिलौदा येथील रहिवासी आहे. आजोबा नातवात बालपण शोधत असल्याने दोघांमध्येही नात्याची वीण अधिक घट्ट राहते. वृद्धापकाळात पत्नी, मुलासह नातवाचाही आधार राहतो. उदयसिंग यांच्या पत्नी व मुलाचा मृत्यू झाल्याने त्यांची मानसिकता बिघडली आणि याच विमनस्क अवस्थेत मध्य प्रदेशातून थेट विदर्भात आले.

तब्बल सहा महिने भटकंती सुरू असताना यवतमाळ शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांना भारी येथून राजेश डफाळ यांचा फोन आला. सत्तर वर्षांचा वृद्घ आपल्या घराच्या शोधात असल्याची माहिती मिळताच तत्काळ ठाणेदार शिरस्कर यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. कोणतीही माहिती न विचारता वृद्धाला जवळ असलेल्या ढाब्यावर नेले. जेवण, अंगवस्त्र उपलब्ध करून दिले. नाव, गाव विचारून ठाणेदारांनी थेट गौतमपुरा येथील पोलिस ठाण्याशी संपर्क साधत वृद्घाबाबत माहिती दिली.

दिलेल्या पत्त्यावर नातू भुवनेषसिंग जितेंद्रसिंग राजपूत राहत असल्याचे सांगितले. ठाणेदार शिरस्कर यांनी नातवाशी संपर्क साधून आजोबा यवतमाळला असून, बोलावून घेतले. आजोबांचा सहा महिन्यांपासून शोध घेऊन थकलेल्या नातवानेही यवतमाळ शहर गाठले. पोलिस ठाण्यात आजोबा सुखरूप असल्याचे दिसताच गळाभेट घेऊन रडू लागला. यावेळी आजोबा व पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना अश्रू आवरता आले नाहीत.

रेल्वे अन् पायदळ प्रवास

उदयसिंग यांनी सहा महिन्यांपूर्वी आपले राहते घर सोडून इंदोर गाठले. तेथे काही दिवस राहिल्यावर इंदोर ते वर्धा असा रेल्वेने प्रवास केला. विनामास्क स्थितीत भटकत असताना वर्धा येथून पायदळ चालत येत त्यांनी यवतमाळ गाठले. कालांतराने त्यांना आपल्या घराची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती.

(Tears-in-the-grandson's-eyes-when-he-saw-his-grandfather-in-Yavatmal-district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT