दरम्यान मंगळवारी जप्त केलेला वाळू साठा जिगाव प्रकल्पांतर्गत भोन या गावाचे गावठाण पुनर्वसनचे काम करणाऱ्या कंत्राकाराच्या स्वाधीन करण्यात आला आहे.  Sakal
विदर्भ

Sangrampur News : तहसीलदारांचा अवैध वाळू साठ्यांवर कारवाईचा सपाटा; 7 लाख रुपये किंमतीच्या ४५० ब्रास वाळू साठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर : गत काही दिवसांपासून संग्रामपूर तहसीलदारांनी अवैधरित्या साठवून ठेवलेल्या वाळू साठ्यांना लक्ष केले आहे. मंगळवारी तब्बल ४५० ब्रास अवैद्यपणे साठवलेल्या वाळूच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली. तहसीलदारांकडून वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांसह अवैध वाळू साठ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

मंगळवारी तहसीलदार यांच्या नेतृत्वातील पथकाकडून संग्रामपूर तालुक्यातील ग्राम सावळी या गावालगत वनविभागाच्या जमिनीवर तब्बल ४५० ब्रास अवैद्य साठवून ठेवलेल्या वाळूच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांनी वाळू तस्करांवर लगाम लावण्यासाठी कारवाईचा बडगा उगारल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली.

दरम्यान मंगळवारी जप्त केलेला वाळू साठा जिगाव प्रकल्पांतर्गत भोन या गावाचे गावठाण पुनर्वसनचे काम करणाऱ्या कंत्राकाराच्या स्वाधीन करण्यात आला आहे. बूधवारी कंत्राटदाराकडून ७ लाख २० हजार रुपयांचे स्वामित्व धनाचे चलन भरून घेण्यात आले आहे. या रकमेचे १० टक्के रक्कम कंत्राटदाराकडून जिल्हा गौण खनिज निधी मध्ये जमा करण्यात आले आहे. हि कारवाई तहसीलदारांसह मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांच्याकडून करण्यात आली.

तीन दिवसात दूसरी मोठी कारवाई

संग्रामपुर तालुक्यातील खिरोडा येथे दि. २५ ला चार ठिकाणी अवैधरित्या साठवून ठेवलेल्या ३५० ब्रास वाळू साठ्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत २ लाख ७० हजार रुपये किंमतीचे वाळू साठे लिलाव पद्धतीने कंत्राटदाराला सुपूर्द करण्यात आले होते. पून्हा तीन दिवसांनी दि २८ ला ग्राम सावळी गावालगत ७ लाख २० हजार किंमत असलेला ४५० ब्रास वाळू साठा स्वामित्व धनाचे चलन भरून बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला देण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसात तालुक्यात दोन मोठ्या कारवाईत ९ लाख ९० हजार किंमतीचे तब्बल ८०० ब्रास अवैद्य वाळू साठे जप्त करण्यात आले आहे. सदर साठे शासकीय जमिनीवर आढळून आल्याने गुन्हे दाखल करण्यात आले नाही. अवैद्य वाळू साठ्यांवर कारवाई सूरूच राहणार असून यापुढे खाजगी जागेत अवैद्य वाळूसाठे आढळून आल्यास जागा मालकावर गौण खनिज अधिनियमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

- योगेश्वर टोम्पे तहसीलदार संग्रामपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT