हिंगणघाट (जि. वर्धा) : महामार्गावर वाहनांच्या धडकेमुळे मृत्युमुखी पडणारे पशुपक्षी (Two animal friends), वन्यप्राणी याबाबत जनजागृती करण्याच्या उदेशाने तेलंगणा येथील दोन धाडसी युवकांनी मन्चेरियल ते वाराणशी सायकल प्रवास सुरू (funerals on dead animal) केला आहे. प्रवासाच्या आठव्या दिवशी शेडगाव (पाटी) येथे थांबले असता त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. (Telangana-Two-animal-friends-perform-funerals-on-dead-animal-birds-on-the-road)
फ्रेंड्स ॲनिमल ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक पद्म संदेश गुप्ता आणि मित्र बेलीगंडूला नरेश हे दोघे ‘सेव लाईफ सेव नेचर’ हा उदेश घेऊन २,५०० किलोमीटरच्या प्रवासाला सायकलने निघाले आहेत. काल रात्री त्यांनी शेडगाव (पाटी) येथील श्री गजानन महाराज मंदिरात आश्रय घेतला. राष्ट्रीय महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे रस्त्यावर अनेक पशुपक्षी, वन्यप्राणी मृत्युमुखी पडतात. वाहनचालक वेळीच त्या प्राण्यांची विल्हेवाट लावीत नाही आणि पुढे निघून जातात. रस्त्यावर मृत जनावरे तसेच पडून असतात. यातून अन्य वाहनांचे अपघातही होतात. त्याचप्रमाणे जनावरे रस्त्यावरच कुजून दुर्गंधी सुटते. यातून रोगकारक जंतूचा प्रसार होऊन आरोग्य धोक्यात येते. याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. हा उदेश समोर ठेवून २,५०० किलोमीटरचा प्रवास सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवासादरम्यान त्यांना मृत पशुपक्षी आढळल्यास थांबून रस्त्याच्या कडेला खड्डा करून पुरतात. या प्रकाराबाबत हे युवक अत्यंत संवेदनशील असून याप्रकारचे अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी सतर्कतेने वाहने चालविणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रवासाची सुरुवात त्यांनी तेलंगणा राज्यातील म्न्चेरियल येथील हमालीवाडा हनुमान शिर्डी साई मंदिरात प्रार्थना करून केली. यानंतर चंद्रपूरमार्गे ते जाम आणि नागपूरच्या दिशेने पुढे वाराणशी प्रवास करणार आहेत. परतीचा प्रवासही ते सायकलनेच करणार आहे.
दररोज ६० किलोमीटरचा प्रवास
वाराणशीला पोहोचण्यासाठी २५ दिवस लागणार आहेत. दररोज ते ६० किलोमीटरचा प्रवास करतात. हे दोघेही ३१ वर्षीय युवक असून ६० दिवसांत हा प्रवास पूर्ण करण्याचे ठरवले आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षितस्थळ शोधून तेथे आश्रय घेतात. पाऊस आणि प्रतिकूल हवामान स्थितीमुळे त्यांचा प्रवास लांबूही शकतो. त्यांनी सायकलला तिरंगी रंग दिलेला आहे. दानशूर व्यक्ती आणि सामाजिक जाणीव असलेल्या लोकांची मदत घेऊन ते हा मैलाचा दगड गाठणार आहेत.
(Telangana-Two-animal-friends-perform-funerals-on-dead-animal-birds-on-the-road)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.