विदर्भ

शाब्बासऽऽ शतकापूर्वी ब्रिटिशांनी उभारलेली वनराई शाबूत

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी अकोला-हैदराबाद महामार्गावर (The British built the Akola-Hyderabad highway) १४ एकर जागेत बगीचा साकारला होता. त्यातली वनराई आजही शाबूत आहेत. वाशीम जिल्ह्याची निर्मिती होऊन पावशतक उलटले. तरी आपल्या लोकांना अजून एकही बगिचा धड उभारता आला नाही. उलट १४ एकर जागेतील इंग्रजकालीन टेंपल गार्डनमधील निम्मी जागा व्यावसायिक उद्देशासाठी बळकावली (Half the space was grabbed for commercial purposes). तिथे व्यापारी संकुल उभे केले. उर्वरित जागेवर गार्डन उभारण्याची प्रक्रिया मात्र अतिशय संथपणे सुरू आहे. टिळक गार्डन तर ओसाडच आहे. आपल्या जीवनातील वृक्षांची अनन्यसाधारण महती जगदगुरू तुकाराम महाराजांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या अभंगातून कथन केली. मानवी जीवनात वृक्षांचे आणि ते निर्माण करीत असलेल्या ऑक्सिजनचे किती महत्त्व (The importance of oxygen) आहे, हे सांगण्याची त्यानंतर कुणालाही गरज पडली नाही. कोरोना काळात तर आपले श्वासही ‘ऑक्सिजन सिलेंडर’कडे गहाण ठेवण्याची जीवघेणी वेळ आपल्यावर आली. वाशीम शहराच्या कर्त्याधर्त्या लोकप्रतिनिधींना यापूर्वी वृक्ष आणि बगिच्यांचे महत्त्व उलगडले नव्हेत. परंतु, या संकटानंतर तरी ‘ऑक्सिजन’च्या दुश्मनांनी ‘होश’मध्ये यावे. (The forest built by the British a century ago is intact in wasim)

रिसोडला मुक्काम केल्यानंतर सकाळी बसने वाशीमला निघालो. हराळ फाट्यावर हराळचे बातमीदार संदीप सरकटे यांची भेट झाली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर वाशीमकडे निघालो. वाशीम शहर लागल्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांनीच स्वागत केले. बसस्थानकावर ‘सकाळ’चे वाशीम जिल्हा बातमीदार राम चौधरी यांनी रिसिव्ह केले. तेथून पाटणी चौकात आलो. या चौकात लाॅकडाऊन असूनही तुफान गर्दी दिसली. उकाडा जाणवत असल्याने शहरातील बगिच्यात निवांत बसू, असे म्हणताच चौधरी यांनी जिल्हा निर्मितीपासून शहरात बगिचा नसल्याचे सांगितले. टेम्पल गार्डनचे काम अर्धवट असल्याचे समजले. मग पाटणी चौकातून अकोला नाकामार्गे टेम्पल गार्डनकडे निघालो. सर्वसाधारण बगीचा म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येते हिरवाई. मात्र या बगीच्याच्या प्रवेशद्वारावरच चाट पडलो. ही स्मशानभूमी की गार्डन हा प्रश्न मनात निर्माण झाला.

सात वर्षांपूर्वी शहराच्या उत्तरेला नव्या नगरपालिका इमारतीजवळील १४ एकर जागेतील इंग्रजकालीन टेंपल गार्डन हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी यातील अर्धे गार्डन व्यापारी संकुलासाठी तयार केले. मुळात बगीच्याचे आरक्षण हटवून व्यापारी संकुल बांधता येत नाही. असे असताना या जागेवर व्यापारी संकुल बांधण्यात आले. त्यावेळी शहरातील काही नागरिकांनी बगीच्याच्या कॉंक्रिटीकरणाला विरोध केला होता. मात्र, उर्वरित जागेत सुसज्य बगीचा साकारेल, असे आश्वासन देऊन विरोध दडपण्यात आला. तीन वर्षात भव्य व्यापारी संकुल उभे राहिले. मात्र, टेम्पल गार्डनची कासवगती कायम राहिली. या जागेत नगरपालिकेच्या वतीने सुरक्षा भिंत व चार झोनच्या कामाचे कंत्राट देण्यात आले होते. तसेच मोनोरेल, तारांगण, अ‍ॅडव्हेंचर पार्क यासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाला. तरी या बगिच्यात प्रसन्न वाटावे असे काही नाही. दक्षिणेकडील प्रवेशद्वारातून गुरे, असामाजिक तत्त्वांची सतत ये-जा असते. अंतर्गत रस्त्यांमधील पेव्हर ब्लॉक उद्यान सुरू होण्यापूर्वीच उखडले आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी ठेवलेला रनगाडा दुर्दैवाचे दशावतार सांगत उभा आहे. अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये असलेले झुले रानवेलीच्या विळख्यात आहेत. निधीची कमतरता असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी उपलब्ध निधीतील कामे कासवगतीने होत असल्याने शहरात सध्या एकही बगीच्या नाही.

असा झाला बगीच्यावर खर्च

गेल्या सात वर्षांपासून अतिशय संथपणे सुरू असलेल्या टेम्पल गार्डनच्या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. सुरक्षाभिंतीसाठी १ कोटी १ लाख रुपये मंजूर झाले. ८९ लाखांचे काम पूर्ण झाले. विकासकामाच्या झोन एकसाठी एक कोटी ६९ लाख, दुसऱ्या झोनसाठी एक कोटी चार लाख, तिसऱ्या झोनसाठी एक कोटी ५७ लाख व चौथ्या झोनसाठी १ कोटी आठ लाख रुपयेे मंजूर झाले आहेत. त्यातील अनेक कामे ७० टक्क्यांवर पूर्ण झाली असली तरी पुढील काम थांबले आहे. या गार्डनमध्ये अ‍ॅडव्हेंचर पार्कसाठी ५० लाखांचा निधी मंजूर झाला होता. हे काम पूर्ण झाले असले तरी अद्याप पार्क सुरू झालेले नाही.

तारांगणात दिवसाच दिसतात तारे

जिल्हा वार्षिक योजनेतून या टेम्पल गार्डनमध्ये तारांगण उभारले आहे. त्यासाठी दोन कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यात आले. हे काम पूर्ण झाले असले तरी गेल्या वर्षभरापासून तारांगण बंद आहे. म्हणजे अजून हे तारांगण सुरूच झालेले नाही. तारांगणाच्या डोमने सुरू होण्याआधीच प्लेटची साथ सोडली आहे.

मागील पाच वर्षांत भाजप सरकाच्या काळात पालिकेला विकासाकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. टेम्पल गार्डनचे कामदेखील सुरू झाले होते. मात्र, ते अद्याप पूर्ण झालेले नाही. कामामध्ये काही अडचणी असतील तर याची विचारणा पालिकेकडे केली जाईल. तसेच निधीसंदर्भात काही अडचण असेल तर त्याचेही निरसन करण्यासाठी आपण पालिका प्रशासनास मदत करू. शहरात नागरिकांसाठी बगीचा अतिशय महत्त्वाचा आहे. तो लवकर तयार व्हावा, हीच भूमिका आहे. यासंदर्भात पालिकेला विचारणा करण्यात येईल.
- लखन मलिक, आमदार, वाशीम
या टेम्पल गार्डनचे काम माझ्या कारकिर्दीच्या आधी सुरू झाले. मोनोरेल, अ‍ॅडव्हेंचर पार्कचे काम पूर्ण झाले. तसेच तारांगणही सुरू आहे. लॉकडाउनमुळे गेल्या वर्षभरापासून मजुरांअभावी काम बंद ठेवावे लागले. त्यात निधीची अडचण निर्माण झाली. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत गार्डन नागरिकांच्या सेवेत दाखल होईल.
- अशोक हेडा, नगराध्यक्ष
मरण नको म्हणून ऑक्सिजनसाठी मर मर करणारे आम्ही. ऑक्सिजनच्या नैसर्गिक स्त्रोतांचे मरण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. वाशीममध्ये एकीकडे रस्तेविकासाच्या नावाखाली वृक्षतोड तर दुसरीकडे वृक्षांची घरे म्हणजे बागबगीचे उद्ध्वस्त होत आहेत. गावाची शोभा बनू पाहणारे टेंपल गार्डन आणि टिळक गार्डन स्मशान अवस्थेत शेवटच्या घटका मोजत आहेत. काही महिन्यातच ‘तारांगण’ वार्धक्याने जर्जर झाल्याचे दिसते.
- प्रा. दिलीप जोशी

(The forest built by the British a century ago is intact in wasim)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT