thept 
विदर्भ

हिंगणघाटात धाडसी चोरी! भरदिवसा ६० लाखांच्या ऐवजावर डल्ला 

मंगेश वणीकर

हिंगणघाट (जि. वर्धा) : घराला कुलूप लावून नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी नागपूरला गेलेल्या कोठारी कॉम्लेक्‍स येथील ताराबाई गोविंदराव हुरकट यांच्या घरावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने भरदिवसा डल्ला मारला. या चोरीत चोरट्याने तब्बल ६० लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती घरमालकाने दिली. ही घटना रविवारी (ता. आठ) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. 

दिवाळीच्या तोंडावर भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील कोठारी कॉम्प्लेक्स‍मध्ये ताराबाई गोविंद हुरकट यांचे घर आहे. या इमारतीत त्या तिसऱ्या माळ्यावर राहतात. त्या मुलगा आणि सून यांच्यासोबत सकाळी बाहेरगावी गेल्या होत्या.

दरम्यान, पाळतीवर असलेल्या चोरट्याने याचा फायदा घेत त्यांच्या घराच्या समोरच्या दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील आलमारी तोडून त्यातील ७५० ग्रॅम सोन्याचे दागिने, १० लाख ८० हजारांचे डायमंडचे कडे, दोन किलो चांदी (अंदाजे रक्कम दोन लाख चाळीस हजार रुपये) आणि पंधरा हजार रुपये रोख असा ऐवज घेऊन चोरटे पसार झाल्याचे कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे. 

घटनेची माहिती पोलिसांना होताच घटनास्थळ गाठण्यात आले. भरदिवसा चोरी झाल्याचे कळताच आमदार समीर कुणावार यांनी हुरकट यांच्या घरी भेट दिली. चोरीची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, वर्ध्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांनी घटनास्थळाला भेट देत तपास सुरू केला आहे. अद्याप पोलिसांना चोरट्याचा कुठलाही सुगावा लागला नसून तपास सुरू आहे. 

चोरट्यांची नव्या ठाणेदाराला सलामी 

येथील ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांचे वर्धा येथे बदली झाली. त्यांच्या जागी ठाणेदार म्हणून भानुदास पिदुरकर रुजू झाले. त्यांनी कार्यभार स्वीकारण्यास आठ दिवसांचा कालावधी होत नाही तोच चोरट्यांनी भरदिवसा मोठी चोरी करून त्यांना सलामी दिली. तोंडावर दिवाळी येऊन ठेपली आणि एवढी मोठी चोरी झाल्याने शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. 
 

शेजारी महिलेने पाहिले चोरट्याला 

चोरी करून पसार होत असलेल्या चोरट्याला याच इमारतीतील एका महिलेने पाहिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे चोरट्यांचा लवकरच सुगावा लागेल असे सांगण्यात येत आहे. पोलिसांचे पथक या चोरीच्या शोधाकरिता विविध भागात रवाना झाले आहेत.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

'असे' असेल पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान; KDCA कडून प्राथमिक आराखडा तयार, 'या' एमआयडीसीत 30 एकरांत साकारणार

DY Chandrachud: ''कशाची सुनावणी घ्यायची अन् कशाची नाही, हे एखादा पक्ष ठरवू शकत नाही'' उद्धव सेनेच्या आरोपांवर चंद्रचूड संतापले

Ratnagiri Assembly Election Results : साडेनऊ हजार मतदारांनी नाकारले उमेदवार

Umpire Jobs : क्रिकेट अंपायर बनायचं आहे? जाणून घ्या प्रक्रिया आणि मिळणारी लाखोंची पगार

SCROLL FOR NEXT