there is chance of grampanchayat election in amravati  
विदर्भ

ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजण्याचे संकेत, जिल्हा परिषदेच्या दोन सर्कलमध्येही पोटनिवडणूक

सुधीर भारती

अमरावती : जिल्ह्यातील 524 ग्राम पंचायतींना निवडणुकीचे वेध लागले असून स्थगित आदेश कधी मागे घेतला जातो? याची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, बेनोडा व गायवाडी या दोन जिल्हा परिषद सर्कलसोबतच मुदत संपलेल्या 29 ग्राम पंचायतीच्या प्रभाग रचनेची माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुका लवकरच होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

दर्यापूर तालुक्‍यातील गायवाडी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य बळवंत वानखडे व बेनोडा सर्कलचे सदस्य देवेंद्र भुयार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. विधानसभा सदस्य झाल्याने त्यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. देवेंद्र भुयार मोर्शी, तर वानखडे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. रिक्त झालेल्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहेत. त्याची तयारी सुरू करण्यात आली असून निवडणूक आयोगाने दोन्ही सर्कलची मतदारसंख्या व प्रभाग रचना मागितली आहे.

कोरोना संक्रमणामुळे ग्राम पंचायतीच्या निवडणुकांना निवडणूक आयोगाने बेमुदत काळासाठी स्थगिती दिल्याने त्या लांबणीवर पडल्या आहेत. मार्च महिन्यात जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 524 ग्राम पंचायतीच्या 5391 सदस्यांसाठी निवडणुका होणार होत्या. त्यासाठी निवडणूक प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. राजकीय वातावरण तापू लागले होते. इच्छुकांनी नामनिर्देशनही दाखल केले. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अखरेच्या दिवशी 30 मार्चला राज्य निवडणूक आयोगाने कोरोना संक्रमणाचे कारणे समोर करून निवडणुका अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्याचे आदेश बजावलेत व इच्छुकांची तयारीला ब्रेक लागले. या सर्व ग्राम पंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. 

या 524 ग्रामपंचायती पाठोपाठ आणखी 24 ग्राम पंचायतींची मुदत आता संपली आहे. तेथेही निवडणुका प्रस्तावित असून त्या होईस्तोवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिखलदरा तालुक्‍यातील काकादरी व अठाव, तिवसा तालुक्‍यातील मार्डी व दिवानखेड यासह दर्यापूर तालुक्‍यातील रामतीर्थ या पाच ग्राम पंचायतींची मुदत नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये संपत आहे. सध्या संक्रमणाची गती नियंत्रणात असून रुग्णसंख्या कमी झाली आहे. निवडणूक आयोगाकडून ग्राम पंचायत व जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांची माहिती मागण्यात आल्याने येत्या काही दिवसांत निवडणुकीचे पडघम पुन्हा वाजण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT