गडचांदूर (जि. चंद्रपूर) : एखाद्या गावाचा किंवा शहराचा विकास तेथील दळणवळण साधनांच्या सुविधांवर अवलंबून असतो. त्यात दर्जेदार विणलेले रस्त्यांचे जाळे त्या गावाची ओळखही सिद्ध करतात. परंतु राजुरा- गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गावर गडचांदूर १ किमी रस्ताच नसून फक्त खड्डेचं असल्यानें नागरिकांना खड्यातूनच प्रवास करावा लागत आहे.
शहरातील रस्ते दरवर्षी पावसाळ्यात धाय मोकळून रडतात. अवघ्या दोन वर्षापूर्वी दर्जेदार बांधकाम झालेल्या रस्त्याचे पितळ पावसाळ्यात हिवाळ्यात उघडे पडले आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या डागडुजी नंतरही पूर्वी पेक्षा जास्त खड्यानि मार्ग ग्रासला असून प्रवाश्यांना जोखमीचा प्रवास करावा लागत आहे.
विशेष बातमी - “सानिका तुझ्या शिक्षणाची जबाबदारी माझ्याकडे” थेट विधान भवनातून आला फोन आणि तिला बसला आश्चर्याचा धक्का..
गेल्या दोन वर्षपूर्वी बनलेला हरदोन ते बिरसामुडा चौक या गडचांदूर येथील दहा कोटीच्या सात किमीच्या स्त्यापैकी गडचांदूर शहरातील एक किमी रस्त्यात शेकडो खड्डे पडल्याने प्रवास जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे. पावसाला सुरूवात झाली तशीच रस्त्यानेही रंगत कमी केली आणि रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले.
किमान दोन वर्ष तरी या रस्त्याचे डांबरीकरण निघणार नाही, असा सज्जड आत्मविश्वास बांधकामावर उपस्थित अभियंत्याने व्यक्त केला होता. वर्ष पूर्ण होण्याआधीच आत्मविश्वास तुटला सहा महिन्यापासूनच. रस्त्यावरील खड्यांमुळे नागरिकांचे कंबरडे मोडण्याची सुरुवात झाली होती. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामाची ही पावती आहे का? असा सवाल नागरिक बोलून दाखवत आहेत.
अशीच अवस्था पेट्रोल पंप चौक ते माणिकगढ सिमेंट रस्त्याची आहे. या रस्त्यांचे हाल झाले आहेत. राज्य बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. मात्र या रस्त्याच्या डागडुजीकडे वेळवर लक्ष दिले जात नाही. डागडुजी केली जात असली तरी मलिदा लाटण्यावर जास्त व गुणवत्तेवर कमी भर असतो. परिणामी ज्वंलत स्थिती प्रत्येक वर्षी पावसाळ्यात डोळ्यासमोर उभी राहते.
सात किमीचा रस्ताचे काम 21 मार्च 2017 ला पूर्ण झाले होते आणि कंत्राटदारकडून मार्च 2019 पर्यत या मार्गाची डागडुजी सुद्धा करण्यात आली. गेल्या दोन महिन्यापासून रस्त्याची पाण्याच्या सरी चांगल्यास बरसल्याने रस्त्यात शेकडो खड्ड्यांनीअतिक्रमण केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने निकृष्ठ बांधकाम केलेला रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे सुपूर्द झाला आहे.
एक किमीच्या रस्तात फक्त खड्डेचं रस्ता नाहीच
रस्ता निर्मिती होताच या रस्तावर खड्डे पडायला आणि भेगा जायला सुरुवात झाली होती परंतु या कडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हा रस्तेमय खड्डा अजूनही त्याच परिस्थिती हा रस्ता असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे एक खड्डा वाचवताना दुचाकी दुसऱ्या खड्ड्यातजाऊन अडकते त्या मुळे कितेत लोकांचे अपघात होऊन दुखापती झाल्या आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का अशी प्रतिक्रिया लोकांकडून ऐकायला मिळत आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.