विदर्भ

उपचारासाठी ४०० किमीचा प्रवास अन् दोन हजारांत दोन तास ऑक्सिजन; वाचा मृत्यूचा प्रवास

नीलेश डाखोरे

नागपूर : दम्याचा त्रास (Asthma) वाढल्याने कळमगाव गन्ना या आडवळणातील गावापासून तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी येरझारा मारले. जगण्यासाठी तब्बल ४०० किमीचा प्रवास केला. मात्र, नशिबी मरणच आले. प्रशासकीय व आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेचा (Apathy of administrative and health system) आदिवासी युवक बळी ठरला. विकास रमेश गेडाम (वय ३०, रा. मौजा कळमगाव गन्ना, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) असे त्या युवकाचे नाव आहे. (Thirty year old boy died due to lack of treatment)

विकासला एक मे रोजी दम्याचा त्रास जास्त होऊ लागला. त्यामुळे सिंदेवाहीला कोरोना चाचणी केली. आरटीपीसीआर रिपार्ट लवकर न मिळाल्याने अँटिजेन केले. चाचणीत अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर सिटीस्कॅन केले. यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरला माहिती दिली. डॉक्टरांनी रुग्णाला ऑक्सिजनची गरज असल्याने त्वरित हॉस्पिटला नेण्यास सांगितले.

यामुळे दोन मे रोजी शासकीय रुग्णवाहिका मागविली. मात्र, मिळाली नाही. शेवटी खासगी वाहनाने सिंदेवाही येथील खासगी वाहनात चकरा मारल्या मात्र, तेथे ॲडमिट केले नाही. नंतर ब्रम्हपुरीतही बेड मिळाला नाही. गडचिरोलीला नेले तेथेही दाखल करून घेतले नाही. शेवटी चंद्रपूरला आणले. खासगी हास्पिटलमध्येही बेड उपलब्ध नव्हते. अशाप्रकारे या दिवशी २५० किमीचा प्रवास उपचारासाठी करावा लागला.

शेवटी चंद्रपूरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात आणले. तेथे चिठ्ठी काढून डॉक्टरकडे ऑक्सिजनसाठी नेले. दुसरीकडे विकासची स्थिती गंभीर होत चालली होती. त्याला ऑक्सिजनची नितांत गरज होती. त्याच्यावर उपचार सुरू करा, असे हात जोडून विनंती नातेवाईक करीत होते. परंतु, डॉक्टरांनी विकासकडे साधे डोकावूनही पाहिले नाही व रांगेत राहण्यास सांगितले.

‘लिस्टमध्ये नाव लिहा तुमचा नंबर येईल तेव्हा तुम्हाला आवाज देणार’ असे म्हणत बसवून ठेवले. कोविड रूममध्ये ज्या ठिकाणी ऑक्सिजन लावलेले रुग्ण होते, त्या ठिकाणी सायंकाळपर्यंत विकासला ठेवले गेले. विकासला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तळफळत होता. दम दाटत असल्याचे विकास वारंवार डॉक्टरांना सांगत होता. डॉक्टरला ‘ऑक्सिजन बेड द्या, आमच्या पेशंटला बघा’, अशी विनंती नातलग करीत होते. परंतु, बेड मिळाला नाही.

दोन हजारात दोन तास ऑक्सिजन

शेवटी दवाखान्यासमोरील रुग्णवाहिकेमधून दोन हजार रुपये तासाप्रमाणे विकासला ऑक्सिजन उपलब्ध करून दिले. ते देखील फक्त दोनच तास मिळाले. शेवटी रात्री विकासला गावाकडे परत नेण्यात आले. तीन मे रोजी पुन्हा उपचारासाठी नवरगाव, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, गडचिरोली, चंद्रपूर येथील अनेक हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचारासाठी नातेवाइकांनी विनंती केली. उसनवारी करून पैसाही जमविला. मात्र, विकासची मृत्यूची झुंज अखेर गाडीतच संपली. तालुक्याच्या ठिकाणी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रुग्णवाहिका मिळाली असती तर कदाचित विकासचे प्राण वाचले असते.

नागरिकांनी सावधान राहण्याची

कोरोनाची बाधा झाल्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणीही बेड मिळाला नाही किंवा ऑक्सिजनही उपलब्ध झाले नाही. साधा उपचारही न मिळाल्याने विकासचा जीव गेला. जिल्ह्याच्या ठिकाणीही आरोग्य व्यवस्था पार कोलमडी आहे. प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे आणि आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आली आहे. यामुळे आता प्रत्येक नागरिकांनी सावधान राहण्याची गरज आहे.

(Thirty year old boy died due to lack of treatment)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT