three young boys are drowned in the Nala at Ambuja cement colony Chandrapur 
विदर्भ

चंद्रपूर : अंबुजा येथील तीन युवकांचा मंगी नाल्यात बुडून

सिद्धार्थ गोसावी

कोरपना (जि. चंद्रपूर) : आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान येथील अंबुजा सिमेंट लेबर कॉलोनीच्या मागे असलेल्या मंगी नाल्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती अंबुजा सिमेंट सुरक्षा अधिकारी विलास नारखेडे यांनी गडचांदूर पोलीस स्टेशनला दिली. 

सविस्तर वृत्त असे की, आज (ता. 2) सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान सार्थक, मंजित, शुभम, अनुनय ही चारही मुले नाल्याकडे अंघोळीला गेले होते. या नाल्यात सार्थक, मंजित, शुभम हे तिघेजण अंघोळीला गेले. परंतु सोबत असलेला चौथा मुलगा अनुनय हा अंघोळीला गेला नाही. काही वेळाने अंघोळीला गेलेले त्याचे मित्र बाहेर न आल्यामुळे अनुनयने अंबुजा सिमेंट लेबर कॉलोनीकडे धाव घेत घरच्यांना घडलेली सदर घटना सांगितली.

तोपर्यंत गावकऱ्यांनी मुलांची प्रेत बाहेर काढली होती. या घटनेतील शुभम गाजेरे हा युवक 22 तारखेला सुट्या घालविण्याकरीता अंबुजा कॉलोनी उप्परवाही येथे आला होता. 

मृतक मुलांचे नाव - 

1) सार्थक शशीकांत अल्हाट वय - वय 12 वर्षे 
अंबुजा सिमेंट कॉलोनी उप्परवाही

2) मंजित विजय सिंग - वय 14 वर्ष
राह. उप्परवाही मेन गेट वॉर्ड क्रमांक 3

3) शुभम दिवाकर गाजेरे - वय 14 वर्ष
रा. रामटेक जिल्हा नागपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT