गोंदिया : जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत रामघाट (Ramghat)क्रमांक 1 बीट कक्ष क्रमांक 254 बी मध्ये वाघाच्या मृतदेह आढळला असून मृतक वाघाचे नख आणि दांत गायब (Nails and teeth disappear)असल्याने मृतक वाघाची शिकार झाल्याचे प्राथमिक दृष्या आढळून आले आहे. त्यामुळे वन विभागाबरोबरच परिसरात एकच खळबळ माजली आहे.आज सकाळी वनाधिकाऱ्यांद्वारे जंगलात पेट्रोलिंग (Patrolling the forest by forest officials)सुरु असतांना संबधित घटना उघड़ झाली आहे.
अर्जुनी मोरगाव पासून दहा किलोमीटर अंतरावर निलज गावालगत दोन किलोमीटर अंतरावर सदर घटना घडली असून मृतक वाघाचे नख आणि दांत गायब असल्याने त्यांमुळे त्याची शिकार केल्याची प्राथमिक माहीति असून आरोपीनी शिकार कश्याप्रकारे केलि ह्या दृष्टिने तपास सुरु आहे.विशेष म्हणजे ह्या पूर्वी देखील अशिच शिकारीची घटना घडली असून घटना उजागर झाल्यानंतर अनेक आरोपी ला अटक झाली होती.मात्र आजच्या घटनेनंतर ही वनविभागासमोर एक आव्हाहन उभे ठाकले असून वन विभागाद्वारे आरोपीच्या शोध सुरु आहे.(Tiger Hunting news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.