यवतमाळ - कॅनडा येथे वडिलांच्या निधनानंतर पंजाब येथे अस्थी विसर्जन केली. त्यानंतर नांदेड येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर एक जुलैला काळाने घाला घातला. कळंब तालुक्यातील चापर्डानजीक झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर तीन मृतदेह पंजाब तर दोन मृतदेह कॅनडाला मंगळवारी (ता.तीन) रात्री पाठविण्यात आले.
अपघातात भजन कौर चूर सिंग (वय७१), तरजिंदरसिंग परविंदरसिंग (वय२१, रा. दोघेही रा. झिंगडा, जि. शहीद भगतसिंग नगर, राज्य पंजाब), अशी मृत आजी-नातवाची नावे आहेत. जसविंदरसिंग अजितराम (वय४२, रा. हेरीया जि. शहीद भगतसिंग नगर, राज्य पंजाब) असे मृत चालकाचे नाव असून, जसप्रीतसिंग करनेलसिंग नहल (वय४०) आणि बलबीरकौर करनेल सिंग नहल (वय७४, रा. दोघेही रा. रूबी कोर्ट व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा), अशी मृत मायलेकांची नावे आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडा येथील रूबी कोर्ट व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथील जसप्रीत सिंग कर्नल सिंग नहल यांच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वी कॅनडा येथे निधन झाले होते. त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी जसप्रीतसिंग आणि त्याची आई बलबीर कौर दोघेही पंजाबमधील किरतपूर येथे २२ जूनला आले. अस्थी विसर्जनानंतर २९ जूनला चौघेही नांदेडकडे दर्शनासाठी निघाले.
चालक जसविंदर सिंग अजित राम यांच्यासह कार क्रमांक पीबी-११ बी-४९६३ ने निघाले होते. सोमवारी (ता.एक) त्यांची कार कळंब-यवतमाळ मार्गावरील चापर्डाजवळ वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या मागील दिशेने येऊन घुसली. यामध्ये कॅनडा येथील मायलेकांसह पंजाबमधील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवार (ता.दोन) दुपारी पाचही मृतकांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तीन मृतदेह पंजाब, तर दोन मृतदेह नागपूर विमानतळावरून कॅनडाच्या दिशेने रवाना करण्यात आले. यावेळी रुग्णालयात कळंब ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्यासह मृतांचे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार चालकावर कळंब ठाण्यात गुन्हा
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. यामध्ये वाहनांमधील चौघांसह चालकाचाही मृत्यू झाला. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात चालक जसविंदर सिंग अजित राम (वय४२) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.