विदर्भ

ड्रोन डागणार रोप, बियाण्यांच्या बुलेट्‌स!

प्रशांत राॅय
नागपूर : आकाशातून जमिनीवर एका पाठोपाठ एक बुलेट्‌स सोडल्या जात आहेत अन्‌‌‌ डोळ्याची पापणी मिटायच्या आत गोळीबार करणारी यंत्रे दूर निघून जातात. चित्रपटातील वाटावा असा हा युद्धाचा प्रसंग प्रत्यक्षात दिसण्याची शक्‍यता वाढू लागली आहे. फरक फक्त एवढाच की या गोळीबारात कुठेही रक्तपात वा हिंसा नसेल. तर या युद्धात "ट्री प्लॅन्टिंग ड्रोन'द्वारे अंकुरित बियाण्यांच्या बुलेट्‌स डागल्या जातील. वर्षभरात एक ते चार अब्ज वृक्षांची लागवड करणे या तंत्रज्ञानामुळे शक्‍य होणार आहे.
मानवासाठी ऑक्‍सिजन देणाऱ्या वृक्षांवर जगभरात कुऱ्हाड चालवली जात आहे. काही सेकंदांत अर्ध्या एकरापेक्षा अधिक जंगल साफ होत आहे. यामुळे जंगले बोडखी होत असून याचा दृश्‍य परिणाम तापमान वाढीसह मानवी आरोग्यावरही होत आहे. जगभरात वृक्षसंवर्धनाच्या अनेक योजना राबवूनही वृक्षतोडीचा वेग अधिकच आहे. ही बाब लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी ड्रोनद्वारे वृक्षालागवड करता येईल का याच्या प्रयोगाला सुरवात केली. अथक परिश्रमांनंतर त्यांना "ट्री प्लॅन्टिंग ड्रोन' विकसित करण्यात यश आले. या ड्रोनमध्ये अंकुरित बियाणे, रोप निश्‍चित स्थळापर्यंत नेणे आणि गोळी झाडल्याप्रमाणे ते बियाणे जमिनीकडे डागले जाते. या बियाण्यांसोबत आवश्‍यक संजीवक आणि जैवविघटकही असतात. यामुळे बियाणे जमिनीत रुजते आणि त्यांची चांगली वाढही होते, असे या प्रयोगातून दिसून आले आहे. यानंतर जास्त क्षेत्रावर अधिक क्षमतेने वृक्षलागवडीला पूरक असे ड्रोन विकसित केले जाणार असल्याचे संशोधकांनी सांगितले.
"एआय' मदतीला
ठरविलेल्या योग्य ठिकाणी वृक्षलागवड व्हावी यासाठी "ट्री प्लॅन्टिंग ड्रोन'च्या मदतीला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरली जात आहे. यामुळे ड्रोनला दिशानिर्देश मिळणार असून जमिनीवर पाहिजे त्या ठिकाणी अंकुरित रोपांची लागवड करता येईल.
असा होणार फायदा
मानवाकडून होणाऱ्या वृक्षलागवडीपेक्षा किमान दहा पटीने ट्री प्लॅन्टिंग ड्रोन काम करतात, तसेच याचा मजुरी खर्चही मानवाच्या तुलनेत 20 टक्‍क्‍यांपर्यंत कमी राहील असा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अतिशय दुर्गम ठिकाणी, कठीण डोंगरदऱ्यांमध्येही सुलभपणे वृक्षलागवड करता येणार आहे.
  • लागवडीसाठी योग्य जागेचे "एआय'द्वारे स्कॅनिंग
  •  ड्रोनमध्ये सध्या 150 अंकुरित बियाणे नेणे शक्‍य
  • सेकंदाला एक अंकुरित बियाणे बुलेट डागली जाते
  • - ड्रोनमधून दिवसाला एक ते चार लाखांपर्यंत लागवड शक्‍य

शेतीशिवारात सध्या ड्रोनद्वारे वृक्षलागवड फारशी लाभदायक नाही. कारण भारतातील शेतीचा आकार कमी आहे. दुर्गम, डोंगराळ भागात मात्र हे तंत्रज्ञान निश्‍चितच उपयोगी ठरणार आहे. वृक्षलागवडीची मोठी संख्याही गाठता येईल.
-डॉ. उदय खोडके, विभागप्रमुख, कृषी अभियांत्रिकी, वनामकृवि

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: वरळीमध्ये शिवसेने विरुद्ध मनसेकडून तक्रार दाखल; राज ठाकरेंच्या सहीचे पत्र व्हायरल

Elon Musk X Super App : इलॉन मस्कची LinkedInला टक्कर; एका क्लिकमध्ये मिळणार नोकरी, कसं वापरायचं जबरदस्त फिचर? पाहा

Kalyan Vidhansabha: शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याणमध्ये घडणार इतिहास? वाचा महत्वाची बातमी

Elections Voting: ईव्हीएम ‘बिघाडी’ची आघाडी! मतदारांच्या वेळेचं गणित बिघडलं, संताप व्यक्त

Nashik Central Vidhan Sabha Election : ‘नाशिक मध्य’त वेळेत मतदानासाठी प्रयत्‍न; 303 केंद्रांवर आज लोकशाहीचा महाउत्सव

SCROLL FOR NEXT