Truck and bus accidents sakal
विदर्भ

ट्रक व बसचा अपघात; एक प्रवासी ठार, तीन गंभीर

अमरावती मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना शिंगणापूर फाट्याजवळ घडली

गणेश राऊत

नेर : अमरावती मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजता दरम्यान शिंगणापूर फाट्याजवळ घडली.यामधे एक प्रवासी जागीच ठार झाला असून तीन जण गंभीर तर एकूण २५ प्रवासी जखमी झाले आहे.

औरंगाबादवरून भरधाव वेगाने नागपूरकडे निघालेला ट्रक क्रमांक एमएच १६ ए वाय ९७६७ ने यवतमाळ येथून अमरावतीकडे पुसद आगाराची जवळपास ५० प्रवासी घेऊन जाणारी बस क्रमांक एम एच ४० वाय ५९२६ ला जोरदार धडक दिली. मृत व्यक्तीमध्ये पांडुरंग खुशालराव बोडके वय ६५ वर्ष रा. कवठा बु.ता. अचलपुर जिल्हा अमरावती या प्रवाशाचा समावेश आहे.

Truck and bus accidents

तर जखमीमध्ये प्रतीक शेषराव खडसे वय २५ रा. पाथ्रड गोळे,पार्वता पोहनकर वय ६५ रा.पिंपरी कलगा, मुमताज बेगम वय ७०रा. अमरावती,अरुणा अमुने ६३ रा.पुसद, अनिकेत नंदू राठोड १९ पुसद, कुसुम पोहणकर ६९ शिंगणापूर, प्रियंका सतीश दायमा २९ पुसद, वनिता खडसे ५० पाथ्रड गोळे, पंडित कंडेल महागाव, वनिता मेश्राम मालखेड, वाहक प्रेमदास चव्हाण, चेतन सांगानी दारव्हा, सारिका भिडेकर बडनेरा, अश्विन जाधव पुसद, सिद्धार्थ धुळे पुसद, शालिनी गुजर नांदगाव खंडेश्वर, बाळकृष्ण काळे शेंद्री डोलारी, विजय पत्रे पुसद, तुषार भिडेकर बडनेरा, नरेश शागानी दारव्हा, वसंत वाहने दिघी कोल्हे, सुरेखा इंगळे पुसद, साक्षी उंबरकर पुसद,रोशन शहाकार यांचा समावेश आहे.

यातील काही प्रवाश्यांना नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.तर १४ प्रवाशांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविन्यात आले. ट्रकचा वेग एवढा जास्त होता की, बस जवळपास २०० फूट समोर फरफटत गेली.यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते. नांदगाव पोलिसांनी पंचनामा करून ट्रक चालकाला अटक केली आहे. पुढील तपास नांदगाव खंडेश्वरचे ठाणेदार ठाणेदार हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT