two alcoholics died after take deaddiction medicine in chandrapur  Esakal
विदर्भ

Crime News: धक्कादायक! दारू सोडण्याच्या औषधाने दोन तरुणांचा मृत्यू; चंद्रपूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

Crime News: दारू सोडण्यासाठी एका भोंदू वैद्याने दिलेल्या औषधांमुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गुळगाव येथे घडली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

भद्रावती: दारू सोडण्यासाठी एका भोंदू वैद्याने दिलेल्या औषधांमुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गुळगाव येथे घडली. हेच औषध घेतलेल्या आणखी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात एका मृताच्या वडिलांचा समावेश आहे.

भद्रावती तालुक्यातील गुळगाव येथील सहयोग सदाशिव जीवतोडे (वय १९) आणि प्रतीक घनशाम दडमल (वय २६) अशी मृतांची नावे आहे. सदाशिव पुंजाराम जीवतोडे (वय ४५) आणि सोमेश्वर उद्धव वाकडे (वय ३५) यांच्यावर भद्रावती येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सदाशिव हे सहयोगचे वडील आहे. या चारही जणांना दारूचे व्यसन होते. अतिमद्यप्राशनामुळे कौटुंबिक कलहसुद्धा वाढला होता. नजीकच्या व्यक्तींच्या सल्लावरून त्यांनी दारू सोडण्याचे औषध घेण्याचे ठरविले.

मंगळवारी (ता. २१) ते वर्धा जिल्ह्यातील शेडेगाव येथे शेळके महाराज यांच्याकडे गेले. शेळके महाराज औषध देऊन दारू सोडवितो, असा दावा करतात. या चारही जणांनी शेळके महाराजांनी दिलेले औषध तिथेच प्राशन केले आणि गावच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. मात्र, हा औषधांचा परिणाम आहे, असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. घरी आल्यानंतर रात्री या चारही जणांची प्रकृती खालावली. रात्रीच त्वरित २५ किलोमीटर दूर अंतरावरील भद्रावती येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा सहयोग आणि प्रतीक यांचा मृत्यू झाल्याचे डॅाक्टरांना सांगितले. या दोघांचाही वाटेतच मृत्यू झाला. त्यानंतर या दोघांचेही मृतदेह गावाला परत आणले.

मृतांवर आज बुधवारी अंत्यविधीची तयारी सुरू झाली. दरम्यान, एका भोंदू वैद्याच्या दारू सोडण्याच्या औषधीमुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. ते लगेच गावात पोचले. पोलिसांनी अंत्यविधी थांबवून मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले. या चारही जणांना नेमके कुठले औषध दिले होते, हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल. दुसरीकडे समुद्रपूर पोलिसांना शेळके महाराजाला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू होती. अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.

यापूर्वीही झालेत मृत्यू

शेडेगाव येथील वैद्य शेळके महाराज औषध देऊन दारू सोडतात, अशी ख्याती आहे. त्यामुळे त्याच्याकडे औषध घेण्यासाठी मोठी गर्दी असते. त्यांच्या औषधांमुळे यापूर्वी सुद्धा अनेकांचे मृत्यू झालेत, अशी चर्चा आहे. मात्र याची वाच्यता झाली नाही. या प्रकरणाची दखल पोलिसांनी वेळीच घेतल्याने पहिल्यांदा शेळके महाराज पोलिसांच्या हाती लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT