Two boy killed in Khamgaon 
विदर्भ

चाकूने वार अन्‌ दगडाने ठेचून दोघांची हत्या 

सकाळ वृत्तसेवा

खामगाव : अवैध व्ययसायातून शहरात दोन तरुणांची दगडाने ठेवून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारच्या रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून, पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. विशाल देशमुख व सचिन पवार हे दोन्ही युवक शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घाटपुरी नाका भागात राहतात. रात्री दीड वाजता त्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. दोन गटात असलेल्या वादातून हे हत्याकांड घडले. 

खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरात पाणीटाकीजवळ गजानन भोंगळ यांची टपरी देशमुख आणि पवार या दोघांनी तोडली. यातून युवकांचा वाद झाला. याच वादातून विशाल देशमुख (वय 30, रा. घाटपुरी नाका), सचिन पवार (वय 33, रा. किसननगर) यांची धारदार शस्त्र आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या घटनेने जिल्हात खळबळ उडाली आहे. विशाल देशमुख यांचा 19 डिसेंबरला वाढदिवस साजरा झाला तर त्याच रात्री हे हत्याकांड घडले. 

दोन्ही युवक भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असल्याची माहिती आहे. दोघांवरही सुरुवातील चाकूने वार करण्यात आले. नंतर दगडाने ठेचून मारण्यात आले. दोघांचाही मृत्यू झाल्याचे समजताच आरोपींनी तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देशमुख कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

तीन संशयित ताब्यात

अवैध व्यवसायाच्या वादातून हे हत्याकांड घडले, अशी प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू सुरू केली आहे. गजानन भोंगळ, रवींद्र भोंगळ व अरविंद भोंगळ अशी संशयितांची नावे आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हातातून महाराष्ट्र गेला, आता मुंबईही जाणार? महापालिका निवडणुकीत महायुतीचा प्रभाव

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT