two died in auto rickshaw accident in hinganghat of wardha 
विदर्भ

पोटाची खळगी भरण्यासाठी जात होते मजूर, पण वाटेतच काळाची झडप

रूपेश खैरी

हिंगणघाट (जि.वर्धा) : शेतातील कामासाठी हिंगणघाटवरून सेलू (मुरपाड) या गावाकडे शेतमजूर घेऊन जाणाऱ्या ऑटोला भरधाव टिप्परने धडक दिली. यात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर ऑटोचालकासह पाच जण गंभीर झाले. यातील एक घटनास्थळीच ठार झाली तर दुसरीचा मृत्यू सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. ही घटना सावली (वाघ) लगत सोमवारी (ता. 28) सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. यावेळी संतप्त जमावाने धडक देणारे टिप्पर पेटविले. 

चिंधाबाई मारोती कातरे (वय 50) आणि संगीता बबन कापटे (वय 48) दोन्ही रा. चोखोबा वॉर्ड अशी मृतांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली, तर ऑटो चालक पींटू ऊर्फ शेख शाहीद शेख हारून (वय 30), कुसुम प्रकाश मून (वय 53), मंदा विलास तिवाडे (वय 50), गायत्री बबन कापटे (वय 20), कमला सोपान माथकर (वय 60) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वच जखमींची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.  

येथील ऑटोचालक पिंटू ऊर्फ शेख शाहीद शेख हारून हे प्रवासी ऑटोने हिंगणघाट येथून नंदोरी मार्गाने सेलू (मुरपाड) येथे शेतमजूर घेऊन जात होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या एमएच 32 एजे 2609 क्रमांकाच्या टिप्पर चालकने वाहन भरधाव चालवून एमएच 32 सी 9614 क्रमांकाच्या ऑटोला जोरदार धडक दिली. यात ऑटोमधील दोन महिलांचा मृत्यू झाला. इतर महिला जखमी झाल्या. अपघात झाल्याचे कळताच रस्त्याने जाणारे प्रवासी व गावकरी घटनास्थळी पोहोचले. यात टिप्परचालकाची चूक असल्याचे म्हणत संतप्त जमावाने टिप्पर जाळला. याप्रकरणी पोलिसांनी टिप्पर चालक शेख जावेद शेख नरुद्दीन (वय 36) याला ताब्यात घेतले. 

गिट्टी खदानीमुळे नेहमीच असते वर्दळ - 
या मार्गावर गिट्टी खदान असल्याने येथून नेहमीच भरधाव वाहने असतात. विशेषत: यात गिट्टी भरून जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. यामुळे हा रस्ताही खराब झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. येथून होत असलेल्या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासंदर्भात वारंवार मागणी करण्यात आली. पण, त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी अपघात होताच टिप्पर जाळला. 

उभ्या ट्रकला धडक, एक ठार - 
वर्धा-नागपूर मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. यात धडक देणाऱ्या ट्रकचा वाहक राजेश सखाराम घोडजकर (वय 30) हा जागीच ठार झाला. तर, चालक रामेश्वर सखाराम घोडजकर (वय 28) दोन्ही रा. घोडज जि. नांदेड हा गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (ता. 28) पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास सेलू -वर्धा मार्गावर इब्राहिम पेट्रोल पंप समोर घडली.

वर्धा मार्गावर इब्राहिम पेट्रोल पंपाजवळ एमपी 22 एच 2041 क्रमांकाच्या ट्रकचा चालक हरभजनसिंग रतनसिंग कालव (वय 48) रा. जरीपटका ट्रकचे डिझेल चेक करीत होता. दरम्यान मागून येणाऱ्या एमएच 12 एनएक्‍स 1970 क्रमांकाच्या भरधाव ट्रकने धडक दिली. यात रामेश्वर घोडजकर हा गंभीर जखमी झाला व ट्रकमधील वाहक राजेश घोडजकर हा जागीच ठार झाला. याची माहिती सेलू पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनेचा तपास ठाणेदार सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात जमादार राकेश देवगडे, मंगेश वाघाडे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT