two jahal women maoists surrender in gadchiroli Sakal
विदर्भ

Gadchiroli News : आठ लाखांचे होते बक्षीस; दोन जहाल महिला माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. याच क्रमात गुरुवार (ता.११) दोन जहाल महिला माओवादी प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य, सप्लाय टिम/स्टाफ टिम,

(वय ३६) रा. बोगाटोला (गजामेंढी), ता. धानोरा, जि. गडचिरोली व अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य, सप्लाय टिम/स्टाफ टिम, (वय ३४) रा. मरकेगाव ता. धानोरा, जि. गडचिरोली यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण ६६८ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई सन २००५ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २०११ पर्यंत कार्यरत होती.

सन २०११-१४मध्ये वैरागड दलममध्ये, २०१४-१५ मध्ये केकेडी (कुरखेडा, कोरची, देवरी) दलममध्ये, २०१५ मध्ये कंपनी नं. ४ मध्ये बदली होऊन सन २०१८ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती.

सन २०१८ मध्ये कंपनी नं. ४ मध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) म्हणून बढती होऊन सन २०२१पर्यंत, सन २०२२ मध्ये डिके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये बदली होऊन पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) पदावर आजपर्यंत कार्यरत होती.

अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती सन २०१० मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २०१३ पर्यंत कार्यरत होती. सन २०१३-१४ मध्ये प्लाटुन नं. १५ मध्ये सदस्य पदावर, सन २०१४-१५ मध्ये कंपनी नं. ४ मध्ये सदस्य पदावर, सन २०१५ मध्ये डीके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये सदस्य पदावर,

सन २०१८ मध्ये डीके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) पदावर बढती होऊन आजपर्यंत कार्यरत होती. महाराष्ट्र शासनाने प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाईवर व अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती हिच्यावर प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

ही कारवाई, पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील , पोलिस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलिस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल व जसवीर सिंग, कमांडंट ११३ बटालियन सीआरपीएफ यांच्या मार्गदर्शनात पार पाडली.

६६८ माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

प्रमिला बोगा हिच्यावर आजपर्यंत एकुण ४० गुन्हे दाखल असून त्यामध्ये २० चकमक, २ जाळपोळ व १८ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. तर अखिला संकेर हिच्यावर आजपर्यंत एकुण ७ गुन्हे दाखल असून त्यामध्ये २ चकमक, ४ खून, व १ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. गडचिरोली पोलिस दलासमोर आजपर्यंत ६६८ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT