Illegal Sand Mining sakal
विदर्भ

Illegal Sand Mining : अवैध वाळू उत्खननाच्या चौकशीसाठी बेमुदत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : एटापल्ली वनपरिक्षेत्र एटापल्लीअंतर्गत बांडे, झारेवाडा या जंगल परिसरात नदीमध्ये मोठ्या प्रमाणात हजारो ब्रास अवैध वाळू उत्खनन झाले असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आदर्श समाज विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष योगाजी कुडवे यांच्या नेतृत्वात स्थानिक मुख्य वनसंरक्षक कार्यालयापुढे गुरुवार (ता. २७) बेमुदत आंदोलन प्रारंभ करण्यात आले.

एटापल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत बांडे, झारेवाडा या वनव्याप्त परिसरात नदी असून मागील काही महिन्यांपासून या नदी पात्रातून अंदाजे हजारो ब्रास वाळूची अवैधरित्या चोरी झाली आहे. याकडे अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते.

त्यामुळे यास सर्व जबाबदार वनरक्षक, वनपाल वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्याकडून अवैध वाळू उत्खननाची रक्कम या सर्वांच्या सेवा पुस्तकात नोंद करून त्यांच्या पगारातून वसूल करावी. या सर्व जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करावे, महसूल विभागाच्या दरानुसार ५ पट दंड आकारून संबंधित कंत्राटदाराकडून तत्काळ रक्कम वसूल करावी आदी मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष योगाजी कुडवे, रवींद्र सेलोटे, जितेंद्र जांभुळकर, मधुकर रेवाडे सहभागी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT