लाखनी (जि. भंडारा) : पालांदूर परिसरातील नागरिकांना जिल्हा व तालुक्याला जोडलेला राज्य मार्ग हा खड्डेमय झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा तर लागतोच मात्र आता या गावांना येणारे पाहुणे ही रस्ता दुरुस्ती झालं काय असे विचारून गावात येणे टाळत आहेत.
हा रस्ता राज्य महामार्ग असून लाखनी ते पालांदूर ला जोडणारा एकमेव रस्ता आहे. मागील दोन वर्षां आधी गोंडेगाव पर्यंत रुंदीकरण झालेले आहे मात्र गुरढा ते पालांदूर गावाला जोडलेला सहा किलोमीटरचा रस्ता हा पूर्णपणे उखडलेले असून यात खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.मात्र याकळे प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांनी ही दुर्लक्ष केलेले आहे.
समोर झालेल्या रुंदिकरनामुळे याही रस्त्याचं रुंदीकरण होईल या अपेक्षेत प्रवाशी व गावकरी आहेत मात्र मागील दोन वर्षांपासून रुंदीकरण ही झालेले नाही तर दुरुस्तीही झाली नाही.यामुळे या रस्त्यावर अपघात होणे ही दिनचर्या च झाली आहे. आता तर या रस्त्यालगत असलेल्या गावांमध्ये येणारे पाहुणे ही गावात येण्याआधी या रस्त्याची दुरुस्ती झाली की नाही असे विचारतात व दुरुस्ती झाल्यावरच येऊ अशी भूमिका घेतात ही बाब गावकऱ्यांना अपमानित करणारी आहे. निवडणूक काळात तरी नेतेमंडळी ही समस्या मार्गी लावतील काय अशी गावकरी विचारणा करत आहेत आहे.
लग्नासाठी होणाऱ्या पाहणी वरही परिणाम
हा रस्ता राज्य महामार्ग आहे मात्र या रस्त्याची दुरवस्था बघून याला राज्य महामार्ग म्हणणे कठीण झाले आहे.याचाच परिणाम लागून असलेल्या गावांमध्ये वर किवा वधू ची पाहणी करण्यासाठी येणारी पाहुणे मंडळी ही या रस्त्याच्या धाकाने येणे टाळत आहे.परिणामी या गावातील लग्न जुडण्यावरही परिणाम होऊ शकतो.
आमच्या गावाला जोडलेला हा रस्ता पूर्णतः खड्डेमय व अपघातांना आमंत्रण देणारा झालेला आहे.आता तर गावात येणारे पाहुणे ही या रस्त्याची विचारणा करून गावात येणे टाळत आहेत.
- प्रशांत सेलोकर, नागरिक जेवनाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.