vidarbh nagpur husband sucide, love story ends  
विदर्भ

पतीने कवटाळले मृत्यूला; "छोटीसी लव्हस्टोरी'चा थरारक अंत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जाती, समाजाची बंधने झुगारत त्यांनी घर सोडले... प्रेमविवाह केला... पुढे काय?, हे कोडेच ठरले होते...त्यात जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला... रेल्वेस्थानक गाठून छतावर चढले... उच्चदाब वाहिनीला स्पर्श त्यांचा मनसुबा होता... ऑटोचालक मदतीला धावून आले... त्यांनी नवविवाहितेला कसेबसे खाली खेचले...पती मात्र, काहीच ऐकून घेत नव्हता...उच्चदाब वाहिनीला स्पर्श केला...यातच त्याचा मृत्यू झाला..."छोटी सी लव्हस्टोरी'चा हा थरारक प्रसंग नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री अनेकांनी अनुभवला.

बिरबल कुथ्थू पहारिया (25) असे मृत पतीचे तर ज्ञानदेवी (19) असे बचावलेल्या पत्नीचे नाव आहे. ते ओडिशाच्या काटाभांजी तालुक्‍यातील रहिवासी आहेत. वयात येताच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. जाती वेगवेगळ्या असल्याने सोबत जगता येणार नाही, याची दोघांनाही कल्पना होती. यामुळेच त्यांनी पळून जाऊन संसार थाटण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे सुमारे दहा दिवसांपूर्वी घर सोडले. मंदिरात जाऊन लग्न केले.

पैसे संपल्याने आत्महत्येचा निर्णय

दहा दिवसांपूर्वीचे ते डोंगरगडला पोहोचले. तिथून नागपूरला आले. सोबत आणलेले पैसे संपले. पोट भरणेही कठीण झाले. यातून दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला. शनिवारी दोघेही नागपूर स्थानकावर आले. रात्री 10.30 वाजताच्या सुमारास अचानक इटारसी एन्डकडे फलाट क्रमांक 1 वरील छतावर चढले. जोर जोरात बोलत असल्याने प्रवाशांचेही लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. त्यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी स्पेशल ट्रेन येऊन थांबली.

दोन तासांचा थरार

प्रवासी, लोहमार्ग पोलिस, आरपीएफचे जवान दोघांनाही खाली उतरण्याची विनवणी करीत होते. वरील उच्चदाब वाहिनीमुळे असलेला धोका लक्षात घेऊन तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. ऑटोचालकांचे नेते अशफाक अन्सारी यांनी छतावर चढून महिलेला ओढून खाली उतरून घेतले. बिरबल मात्र काहीच ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हता. कुणी वर चढण्याचा प्रयत्न केल्यास तो एका डब्यावरून उडी मारून दुसऱ्या डब्यावर जात होता. सुमारे दोन तास हा प्रकार सुरू होता. एका क्षणी त्याने दोन्ही हातांनी वीजवाहिनीला पकडले.

लग्नाच्या काही दिवसातच विधवा

वीजपुरवठा खंडित असला तरी वीजभार सोसण्यापलीकडे होता. हात लावताच तो चिपकून बसला. अन्सारी यांनीच लाकडी दांड्याने त्याला सोडविले. पण, त्याने छतावरून खाली उडी घेतली. यामुळे डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. लग्नाच्या काही दिवसातच विधवा झालेल्या ज्ञानदेवीला अश्रू आवरणेही कठीण होऊन बसले आहे. ती सतत रडत आहे. रविवारी तिला शासकीय वसतिगृहात पाठविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT