विदर्भात मागील काही दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू आहे. यादम्यान यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे सुमारे 45 लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून आता तासभरात भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होतील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
तसेच सुमारे 231 मिमी पाऊस येथे झाला आहे. माझे सहकारी मदनभाऊ येरावार सुद्धा संपर्कात आहेत. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत दिली आहे.
यवतमाळच्या महागावमध्ये पुरात अडकलेल्यांची हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे सुटका केली जाणार आहे. हवामान सुधारल्यानंतर बचावकार्य सुरू होईल. यवतमाळ जिल्ह्यात घराच्या भिंती कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला. तसेच पाच वेगवेगळ्या ठिकाणी एसडीआरएफकडून बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
यवतमाळ शहरात अभूतपूर्व पूर स्थिती पाहयला मिळत असून अनेक भागात पाणी शिरले आहे. रात्री तीन वाजता पासुन तहसीलदार योगेश देशमुख, पालिका मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर बचाव कार्यासाठी फिल्डवर आहेत. रात्री अडीच वाजता पासुन थेट जिल्हाधिकाऱ्यांनी नियत्रंण कक्षाचा ताबा घेतला आहे.
यवतमाळ शहरातील काही भागासह लासीना , कापरा, गावात पाणी शिरले आहे. यवतमाळमध्ये संततधार पावसामुळे घरे, रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.