विदर्भ

Vidhan sabha 2019 : सावनेरमध्ये कोण खेळतोय "ब्लाईंड गेम' केदारांचीही प्रतिष्ठा पणाला 

वीरेंद्रकुमार जोगी

नागपूर : सावनेरचे किंग समजले जाणारे सुनील केदार यांच्यविरुद्ध संघटनेचे कौशल्य असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याने ही लढत भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. ही बाब केदार यांना समजल्याने त्यांनीही या लढताईत सर्वस्व पणाला लावले आहे. तर डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी देऊन भाजपने खेळलेला "ब्लाईंट गेम' त्यांचे राजकारणातील भविष्य ठरविणारा आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यांचा सावनेर मतदारसंघातील कळमेश्‍व येथे पोहचल्यावर डॉ. राजीव पोतदार यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून डॉ. पोतदार यांची बाजू उमेदवारीसाठी मजबूत झाली होती. ते 2004 पासून भाजपकडे उमेदवारीसाठी तगादा लावत होते. मध्यंतरी युतीमध्ये सावनेरची जागा शिवसेनेला द्यावी अशी मागणी करून खेळी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुख्यमंत्र्याचे लाडके असलेल्या पोतदारांवर त्यांचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसले नव्हते. यातच सिल्लेवाडा येथे स्टार बससेवेच्या उद्‌घाटनाचा वाद भाजपच्या पथ्यावर पडला. पोतदार यांची उमेदवारी निश्‍चित होण्याचा मार्गही मोकळा झाला. तेव्हापासूनच सावनेरची लढत ही केदार यांच्यासाठी सोपी नसेल असे चित्र दिसू लागले होते. 
सावनेरच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या केदार यांनी ही बाब अचूक हेरली. कॉंग्रेसच्या पहिल्याच यादीत नाव आल्याने त्यांचे कॉंग्रेसमधील वजनही वाढल्याचे समोर आले. शिवाय भाजपवरही दबाव वाढविण्यात ते यशस्वी ठरले. उमदवारी अर्ज दाखल करताना सावनेरमध्ये जमलेली केदार समर्थकांची गर्दी त्यांच्या वर्चस्वाची पावती देणारी होती. यामुळे भाजपच्या गोटात धडकी भरली. केदार यांचा आक्रमक प्रचार सुरू आहे. तेवढीच आक्रमकता भाजप दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. अमित शहा यांची खापरखेडा येथील सभेचा प्रचार केल्यानंतर ती रद्द झाल्याने भाजपच्या प्रचाराची धार बोथड झाली हे विशेष. पोतदार हे शांतपणे प्रचार करीत आहेत. वादळापूर्वीची शांतता तर नाही ना!, अशीही शंका उपस्थित केली जात आहे. 
मतदारसंघातील कळमेश्‍वर व सावनेर तालुक्‍यात कुणबी समाजाचे सर्वच ठिकाणी वर्चस्व आहे. यातही धनोजे कुणबी समाज एकवटल्याचे चित्र यापूर्वी दोन वेळा निर्माण झाल्याने केदार यांचा एकदा पराभव तर दुसऱ्यांदा निसटता विजय झाला होता. यावेळी धनोजे कुणबी समाजातील सोनबा मुसळे व रामराव मोवाडे यांना उमेदवारी दिली नसल्याने मते केदारांना मिळतील अशी आशा केदारांना वाटत आहे. दुसरीकडे स्वत:ची प्रतिमा तयार करण्यात पोतदार यांना यश आले असले तरी त्याचे रुपांतर मतांमध्ये होणार का? हे पाहणे औसुक्‍याचे ठरणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT