Amravati Stone Pelting on Police Station By Mob Esakal
विदर्भ

Amravati Stone Pelting: अमरावतीत भयंकर प्रकार! पोलीस स्टेशनवरच हजारो लोकांकडून दगडफेक, 21 पोलीस जखमी

आशुतोष मसगौंडे

अमरावती: शहरातील नागपुरी गेट पोलिस ठाण्यावर शुक्रवारी (ता. चार) रात्री जमलेल्या जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलिस अधिकारी व कर्मचारी, असे २१ जण जखमी झाले.

जमावाने पोलिसांच्या दहा वाहनांची तोडफोड केली. त्यात काही दुचाकींचा सुद्धा समावेश आहे. शनिवारी (ता. पाच) परिसरात जमावबंदी लागू करण्यात आल्याने तणावपूर्ण शांतता होती.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादस्थित दासनादेवी मंदिराचे विश्वस्त नरसिंह आनंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी रात्री नागपुरी गेट ठाण्यावर काही जण पोहोचले.

जमावाला आधी पोलिसांनी शांत करण्याचा प्रयत्न केला होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती कारवाई केली. नागरिकांनी सार्वजनिक सण, उत्सवाच्या काळात शांतता स्थापण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे.
नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त, अमरावती

जमावातील काही लोकांनी अचानक दगडफेक केल्याने वातावरण चिघळले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. त्यानंतर जमावातील मुख्य २६ जणांसह हजार ते बाराशेच्या आसपास लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, असे नागपुरीगेटचे ठाणेदार हनमंत उरलागोंडावार यांनी सांगितले.

जखमींमध्ये एसआरपीएफ अमरावती शहर पोलिस, क्यूआरटी पथक, होमगार्ड जवानांचाही समावेश आहे. जखमींना तातडीने रात्रीच उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

परिसरात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली असून काही भागांत फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत.

जमावबंदीचे आदेश

पोलिस ठाण्यावर व वाहनांवर झालेल्या दगडफेकीमध्ये जवळपास पाच ते सहा लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. जमावबंदीचे आदेश लागू असून, परिसरात शांतता आहे. ज्यांच्याविरुद्ध जमावाचा आक्षेप होता त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे, असे ठाणेदार हनमंत उरलागोंडावार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पठ्ठ्यानं 31000 करोडला विकली कंपनी अन् कर्मचाऱ्यांना 40 कोटींचा फायदा, कोण आहेत तो भारतीय उद्योगपती?

Navratri 2024: मुलींना वयाच्या ५ व्या वर्षी शिकवाव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी, प्रत्येक आई-वडीलांची जबाबदारी

Amazon Prime Free : ॲमेझॉन प्राईमवर पैसे खर्च न करता एंटरटेनमेंट हवंय? फ्रीमध्ये मिळणार सबस्क्रिप्शन, वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स

अरे भाऊ...! भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीवर कॅप्टन Suryakumar Yadav इम्प्रेस, भन्नाट Video

Rhea Chakraborty : ड्रग्स घोटाळ्यातून सुटते न सुटते तोच रिया अडकली पुन्हा संकटात ! 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

SCROLL FOR NEXT