file photo 
विदर्भ

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अकरा गावांतील मतदार घालणार ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

संतोष रोकडे

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया)  : पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गटग्रामपंचायत भरनोलीचे विभाजन करून राजोलीला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करीत अकरा गावांतील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीसह अन्य कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात गटग्रामपंचायत भरनोली अस्तित्वात आहे. या ग्रामपंचायतीमध्ये अकरा गावांचा समावेश आहे. यामध्ये भरनोली, राजोली, खडकी, खडकी क्रमांक-२, सायगाव, तुकुम, नवीनटोला, शिवरामटोला, बलीटोला, तिरखुरी व बोरटोला आदींचा समावेश आहे. गटग्रामपंचायत भरनोलीचे विभाजन करून राजोली गावची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी, अशी अनेक दिवसांची मागणी आहे.


गटग्रामपंचायतचे विभाजन करा  

गटग्रामपंचायत विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायत राजोली स्थापन करण्याचे प्रस्ताव ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नागपूर आयुक्त कार्यालयातून १० डिसेंबर २०१९ ला ग्रामविकास मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यापूर्वीही अनेकदा निवेदने व प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र ११ गावांच्या या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही.

राजोलीच्या प्रस्तावाला हवी मंजुरी

या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करून जोपर्यंत नवीन स्वतंत्र ग्रामपंचायत राजोलीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत भरनोली गटग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व मतदार मतदान करणार नाही. येणाऱ्या सर्व निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्यात येईल, असा गंभीर इशारा अकरा गावांतील मतदारांनी दिला आहे.

निवेदनाच्या प्रती ग्रामविकासमंत्री, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, प्रधान सचिव ग्रामविकास मंत्रालय मुंबई, निवडणूक आयुक्त ग्रामपंचायत विभाग नागपूर, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व ठाणेदार केशोरी यांना पाठविण्यात आल्या आहेत.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

आजचे राशिभविष्य - 27 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT