Wardha Abortion Case sakal
विदर्भ

Wardha Abortion Case | औषधी कुठल्या शासकीय रुग्णालयातील

सकाळ वृत्तसेवा

आर्वी (जि. वर्धा) : डॉ. रेखा कदम हिने केलेल्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी झालेल्या तपासात कदम हॉस्पीटल मध्ये मिळालेली शासकीय उपयोगाची औषधी कुठल्या शासकीय रुग्णालयामधुन आणली हा संशोधनाचा विषय ठरत असुन या प्रकरणी खाद्य व औषधी प्रशासनाने याचा तपास सुरू केला आहे. (Wardha Abortion Case)

कदम हॉस्पीटल मध्ये डॉ. रेखा कदम हिने केलेल्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी ठाणेदार भानुदास पिदुरकर व पोलीस चमुने कदम हॉस्पीटल व निवास स्थानी घेतलेल्या झडती मध्ये पोलीसांना शासकीय रुग्णालयाच्या वापराकरीता असलेल्या ७२ हजाराच्यावर मालाईन व गर्भपाता करीता वापरल्या जात असलेल्या ९० इंजेक्शन सापडल्या.

डॉ. रेखा कदम हिचे पती डॉ. निरज कदम हे येथील उपजिल्हा रुग्णालयात गत चार वर्षा पासुन कंत्राटी पध्दतीवर कार्यरत आहेत. याच उपजिल्हा रुग्णालयामधुन त्यांनी औषधांची अफरातफर केली असावी असा स्पष्ट आरोप वैध्यकीय अधिक्षक डॉ. मोहन सुटे यांनी लावत येथील पोलीसात तक्रार सुध्दा दाखल केली आहे.

आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालयाला वितरीत केलेल्या औषधांचा हिशेब औषधी पुरवठा विभाग व रुग्णालयातील औषधी भांडार विभागाकडे असतो. याचा ताळमेळ दररोज केल्या जातो. येथील उपजिल्हा रुग्णालयाला आलेली औषधी व रुग्णाकरीता वितरीत केलेली औषधी याची नोंद रुग्णालयाच्या साठा पुस्तीकेत असुन तो बरोबर आहे. तर कदम हॉस्पीटल मध्ये मिळुन आलेल्या औषधी कोणत्या शासकीय रुग्णालयामधुन चोरीला गेल्या हा फार मोठा संशोधनाचा विषय असुन याचा तपास खाद्य व औषधी प्रशासनाचे अधिकारी करीत आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील साठा पुस्तीकाचा हिशेब बरोबर

वर्धा जिल्हा शैल्यचिकीत्सक डॉ. सचीन तडस यांनी गुरुवारी (ता.२०) येथील उपिजिल्हा रुग्णलयाला भैट देवुन ओपीडी सह सर्व रुग्णालयाची पाहणी केली. याशिवाय दस्ताऐवज सुध्दा तपासले. यावेळी माहिती देतांना त्यांनी सांगीतले की, आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयाला प्राप्त झालेल्या औषधी व उपयोगात आलेल्या औषधी यांचा हिशेब बरोबर आहे. शासनाच्या माध्यमातुन एकाच बॅचच्या औषधी अनेक रुग्णालयात वितरण केल्या जाते. यातुन डॉ. कदम यांच्या दवाखाण्यात मिळालेल्या औषधी कुठल्या शासकीय रुग्णालयातील आहेत याचा शोध खाद्य, अन्न् व औषधी प्रशासनाच्या माध्यमातुन घेतल्या जात आहे अशी माहिती दिली.

वन विभाग मागणार डॉ. निरज कदम याचा ताबा

शनीवार (ता.१५) व रवीवारी (ता.१६) कदम हॉस्पीटलची पोलीसांनी झडती घेतली. यात वन्य जिव प्राणी काळवीटाची कमावलेली कातडी मिळाली या प्रकरणी येथील वन परिक्षेत्र अधिकारी एन. एस. जाधव यांनी वन्य वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९ व ३९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद घेवुन प्रकरण तपासाला घेतले. मात्र तत्पुर्वीच पोलीसांनी डॉ. निरज कदम याला अटक केली. दोन दिवसाच्या पोलीस कोठडी नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेली आहे. जो पर्यंत डॉ. निरज कदम यांची विचारपुस होत नाही तो पर्यंत काळवीटाच्या कातडी प्रकरणातील आरोपी सिध्द करणे कठीण आहे. याशिवाय सन २००२ ला शासनाने काढलेल्या परिपत्रका प्रमाणे ति कातडी वनविभागात रजिस्टर तर केली नाही ना याची माहिती घेण्याकरीता डॉ निरज कदम याला ताब्यात घेवुन तपास करणे आवश्यक आहे. याकरीता वन विभागाने न्यायालयीन प्रक्रीयेची तयारी सुरू केली असुन याला दोषी डॉ. निरज कदम अथवा डॉ. कुमारसिंह कदम यापैकी कोण हे निश्पन्न होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT