Wardha Crime News esakal
विदर्भ

Wardha Crime: वर्ध्यात प्रेम प्रकरणातून थरार... युवतीचा वाढदिवस असल्याने 'तो' रुमवर गेला अन् तिथं तिसऱ्याला बघून घडलं भलतंच

Sandip Kapde

वर्ध्यात प्रेम प्रकरणातून एक युवकाचा खून आणि युवतीला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. मृतकाचे नाव मोहित मोहुर्ले असून आरोपीचे नाव प्रवीण सोनटक्के आहे. हे तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.  सदर घटना वर्ध्यात खळबळ माजवणारी आहे आणि पोलिस तपास सुरू आहे.

घटना कशी घडली?-

युवतीचा वाढदिवस असल्याने आरोपी प्रवीण सोनटक्के वर्ध्यात आला होता. त्याने युवतीला फोन केला असता, तिने फोन उचलला नाही. त्यामुळे आरोपी युवतीच्या रूमवर गेला असता, तिथे त्याला मोहित मोहुर्ले हार्दिक दिसला. हा प्रसंग पाहून प्रवीणचा राग अनावर झाला.

आरोपीने लोखंडी रॉडने मोहित आणि युवतीवर हल्ला केला. यात मोहितचा जागीच मृत्यू झाला, तर युवती गंभीर जखमी झाली. सध्या युवतीवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची पार्श्वभूमी-

आरोपी आणि मृतक चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणीच्या गावातील आहेत. मृतक मोहित तरुणीचा मामे भाऊ असल्याची माहिती आहे. प्रेमसंबंधातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

युवतीची परिस्थिती-

युवतीची सावंगी येथे नर्सिंगच्या एएनएमच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. साई पार्क परिसरातील भाड्याच्या घरात ती राहत होती.

पोलिसांची कारवाई-

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी प्रवीण सोनटक्के याला ताब्यात घेतले आहे. हत्येचा थरार मध्यरात्री घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT