वर्धा : शिवीगाळ केल्याच्या क्षुल्लक कारणातून झालेल्या वादात मध्यरात्री युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना शहरातील जूना आरटीओ चौकात रविवारी (ता. पाच) मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. अक्षय सोनटक्के (वय २३) रा. तुकाराम वॉर्ड, वर्धा असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून निलेश पटेल यांच्यासह अन्य सात जणांना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मुख्य आरोपी मयूर गिरी फरार आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, अक्षयचा मित्र अमोल तामगाडगे याचा वाढदिवस होता. त्या निमित्त जुना आरटीओ चौकात केक कापण्याचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान पार्टीतील काही युवकांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करणे सुरू केली. दरम्यान तीन दुचाकीवरून जाणाऱ्या सात जणांनी दुचाकी थांबवून शिवीगाळ कुणाला करतो असे म्हणून हटकले. यावरून दोन गटात वाद उफाळला. यात दोन गटात हाणामारी झाली. दरम्यान मयूर गिरी रा. पुलफैल याने धारदार शस्त्राने अक्षय याच्या कोथ्यावर वार केला. अक्षय रक्ताच्या थारोळ्यात पडताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यात गंभीर जखमी झालेल्या अक्षयला तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
गुन्हा करणाऱ्यात अल्पवयीन
अक्षयच्या खून प्रकरणी निलेश पटेल यांच्यासह अन्य सात जणांना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर घटनेलील मुख्य आरोपी मयूर गिरी हा फरार आहे. ताब्यात घेतलेल्या सात जणांमध्ये पाच जण १८ वर्षांपेक्षा कमी वर्षांचे आहेत.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
खून झाल्यानंतर रस्त्यावर रक्ताचे पडलेले डाग मिटविण्यासाठी निलेश पटेल तेथे गेला होता. दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.