navegao 
विदर्भ

काय म्हणता? सात हजार कुटुंबीयांचा जीव धोक्‍यात! वाचा काय आहे कारण

संजीव बडोले

नवेगावबांध (जि. गोंदिया) : निसर्गातील मानवाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. परिणामी मानवी जीवनच धोक्यात आले आहे. नवेगावबांध जलाशयाला प्रदूषणाचा विळखा पडला आहे.

शिवाय तलावाच्या बुडीत क्षेत्रातील शेकडो एकर जमिनीवरील अतिक्रमणामुळे पाणीसाठा कमी झाला आहे. शेतात खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून रासायनिक खते, कीटकनाशक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने तलावातील पाणी दूषित झाले आहे. परिणामी, २७ गावे व चार वाड्यांमधील सात हजार कुटुंबीयांचा जीव धोक्‍यात आला आहे.

अठराव्या शतकात कोलू ऊर्फ कवळू पाटील डोंगरवार यांनी सात पर्वतरांगांच्या मधल्या भागात या तलावाची निर्मिती केली. अपूर्ण राहिलेले बांधकाम त्यांचे सुपुत्र नवेगावबांधचे मालगुजार सीताराम पाटील डोंगरवार यांनी पूर्ण केले. केवळ शेतीसाठी सिंचन यासाठी या तलावाची निर्मिती झाली.

गट क्रमांक १२९२ असून, या तलावाचे बुडीतक्षेत्र आराजी १२२७.६६ हेक्‍टर आर एवढे आहे. या जलाशयाचे पाणलोट क्षेत्र ५६९८ हेक्‍टर आर एवढे आहे.१०३४ हेक्‍टर आर बुडीत क्षेत्र आहे. रामपुरी, एलोडी, जांभळी, पवनी, धाबेटेकडी, रांजीटोला, कोहळीटोला गावातील लोकांनी या बुडीत क्षेत्रात अतिक्रमण केल्यामुळे आता फक्त ८०० हेक्‍टर बुडीत क्षेत्र उपलब्ध आहे. १हजार ७७० हेक्‍टर आर जंगल क्षेत्रातून तलावात गाळ वाहून येतो. या शंभर वर्षांचा विचार केला तर आजघडीला या तलावात ४ लाख ४२ हजार ५०० घनमीटर गाळ साचला असावा, असा धक्कादायक अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
हे जलाशय यंदा ओव्हरफ्लो झाले. गाळ साठल्यामुळे तलाव लवकरच भरतो. उन्हाळ्यात पाणीसाठा लवकरच संपतो. त्यामुळे नवेगावबांध येथील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते. या तलावातील जलसाठा दिवसेंदिवस कमी होतो आहे.

तीन वर्षापासून या तलावावर अवलंबून असलेल्या नवेगावबांधसह पाच निस्तार हक्क गावातील शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामासाठी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. तसेच मागील उन्हाळ्यात नवेगावबांध परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवली. मृतसाठाच शिल्लक राहिला होता.

मोटारपंप लावून मृत साठ्यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नवेगावबांधवासींना करण्यात आला होता. सिंचन व पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस जाणवत आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर पुढे परिसरात सिंचन व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

तलावाच्या बुडीत क्षेत्रात किनाऱ्यालगतच्या लोकांनी अतिक्रमण करून शेतजमिनी काढल्या. त्यामुळे पाण्याचा साठा कमी होण्याबरोबरच पिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी रासायनिक खते व कीटकनाशक औषधे शेतकरी वापरत असल्यामुळे ते तलावातील पाण्यात मिसळते. हेच पाणी पिण्यासाठी वापरले जाते. परिणामी, विषयुक्त पाणी नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरण्याचा धोका आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी वापरणाऱ्या ७ हजार कुटुंबीयांचा जीव धोक्‍यात आला आहे.

गाळ काढण्याचे काम ताबडतोब करावे
या तलावातील गाळ कित्येक वर्षांपासून काढण्यात आला नाही. त्यामुळे या तलावात गाळ साठण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. लाखो टन गाळ यात साचले आहे. या तलावाचे खोलीकरण करून गाळ काढण्याचे काम शासनाने ताबडतोब हाती घ्यावे, अशी मागणी नवेगावबांधसह पाच गावांतील निस्तारहक्क प्राप्त गावकऱ्यांनी केली आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT