नवेगावबांध ( जि. गोंदिया) : येथे पाणीपुरवठा योजनेद्वारे झालेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे येथील ५० ते ६० गावकऱ्यांना अतिसाराची लागण झाल्याचे बुधवारी सायंकाळी उघडकीस आले होते. १५ ते १६ रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, अतिसार वाढीचा संभाव्य धोका लक्षात घेता नवेगावबांध येथील पाणीपुरवठा गुरुवार, १ ऑगस्ट सायंकाळपासून बंद ठेवण्याचे निर्देश तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
त्यानुसार नवेगावबांध ग्रामपंचायत ने आज सायंकाळपासून गावात नळाद्वारे पाणीपुरवठा बंद केला आहे. आज ऑगस्टला ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अतिसाराचा संभाव्य धोका लक्षात घेता नवेगावबांध ग्रामपंचायत च्या व्यवस्थापनाने सुद्धा नवेगावबांध येथील नळ योजनेद्वारे पुरवठा करण्यात येणारा पाणी शुद्ध होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आज घेतलेला आहे.
त्याचप्रमाणे खांबी व सिरेगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यांनी सुद्धा खबरदारीचा उपाय व गावामध्ये अतिसाराची लागण होऊ नये म्हणून ज्या ज्या ठिकाणी खांबी,सिरेगांव पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा केला जातो त्या-त्या गावांमध्ये जनजागृती करून दूषित पाणी न वापरण्याविषयी जनजागृती करण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच पिण्यासाठी ठिकठिकाणी उपलब्ध असलेल्या आरोचा उपयोग करावा.
पावसाळा संपेपर्यंत पाणी उकळून व वस्त्रगाळ करूनच पाणी प्यावे.कुठलाही आजाराची लागण झाली असल्यास तत्काळ दवाखान्याची मदत घ्यावी. दरम्यान, आज नवेगावबांध येथील आरोग्य उपकेंद्राची एक चमू गावामध्ये घरोघरी जाऊन अतिसाराविषयी जनजागृती करीत आहेत.
येथील इंदिरानगर व आखर मोहल्ला प्रभाग क्रमांक ३ व ४ येथील ५० ते ६० नागरिकांना अतिसाराची लागण झाल्याची बाब बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. वैद्यकीय तपासणी नंतर अंदाजे ५०-६० व्यक्तींना अतिसाराची लागण झाली आहे.ज्यांना अतिसाराची लागण झाली आहे, त्यांना रुग्णालयात दाखल होण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या.
गावात रुग्णांची संख्या वाढत असून,आज नवीन १४ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत.तर संभाव्य धोका लक्षात घेता एका ६७ वर्षीय साखरे नावाच्या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे रेफर करण्यात आले आहे अशी माहिती नवेगाव बांध ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आकाश नशिने यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.