Water Tanker sakal
विदर्भ

Water Tanker : २५ जिल्ह्यांचा घसा कोरडाच;साडेतीन हजार टँकरने सुरू आहे पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा

-चेतन देशमुख

यवतमाळ : पावसाळा सुरू होऊन आठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. अजूनही राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नसल्याने २५ जिल्ह्यात टंचाईची तीव्रता कायम आहे. अजूनही तीन हजार गावे तसेच सात हजार वाड्यांना तीन हजार ७७६ टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे.

यंदा राज्यभरात वाढत्या तापमानासोबत दुष्काळी झळाही तीव्र झाल्या होत्या. त्याचा परिणाम राज्यातील २४ जिल्ह्यात दिसून आला. या ठिकाणच्या नागरिकांना टंचाईशी दोन हात करण्याची वेळ आली होती, ती अजूनही कायम आहे. पावसाळा सुरू होऊन आठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पाऊस झाला असला तरीही अनेक भागात अजूनही जलसंकट कायम आहे. सद्यःस्थितीत तीन हजार ५० गावे तसेच सात हजार ६८ वाड्यांना तीन हजार ७७६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

दुष्काळाची सर्वाधिक दाहकता छत्रपती संभाजीनगर विभागात तसेच छत्रपती संभाजीनगर शहरात आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ७४७ तर विभागात २००८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जालना, बीड, परभणी, धाराशीव, लातूर तसेच नांदेड या भागातही टंचाईचे चटके नागरिकांना पावसाळ्यातही बसत आहे. इतर विभागाच्या तुलनेत विदर्भाची स्थिती चांगली आहे. मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पावसाळ्यात पावसाची प्रतीक्षा असली तरी टंचाईची तीव्रता नाही.

जिल्हानिहाय टँकर

ठाणे-४८

रायगड-५८

रत्नागिरी-२६

पालघर-५४

नाशिक-३९७

धुळे-१२

जळगाव-१३७

नगर-२५०

पुणे-२८६

सातारा-११६

सांगली-९१

सोलापूर-१६६

संभाजीनगर-७४७

जालना-५३३

बीड-४५७

परभणी-३५

नांदेड-१०

धाराशीव-१४६

लातूर-४१

अमरावती-१८

बुलडाणा-८०

यवतमाळ-१४

नागपूर-१२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

NIA Raid : ‘एनआयए’चे देशभर २२ ठिकाणी छापे; संशयास्पद साहित्य जप्त, राज्यामध्येही कारवाई

Narendra Modi : ‘काँग्रेस’चा विचारच परदेशी; वाशीमच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा घणाघात

Rahul Gandhi : आरक्षण मर्यादा वाढवणारच! कोल्हापुरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निर्धार

Calcutta Crime : पश्चिम बंगाल पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून

SCROLL FOR NEXT