we contest election only on own basis says forest minister sanjay rathod  
विदर्भ

वनमंत्र्यांची महाविकास आघाडीत वादाची ठिणगी, म्हणाले आता स्वबळावर लढायचंय

प्रसाद नायगावकर

यवतमाळ  :  केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रपती राजवट कशी लावता येईल, यासाठी भाजपचे नेते दररोज सकाळपासून नवनवीन उपदव्याप करीत असतात. काँग्रेसमध्ये भांडणं, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भांडणं आहेत. नशीबाने आपल्या पक्षात अशी भांडणे नाहीत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका शिवसेना म्हणून आपल्याला स्वबळावर लढायच्या आहेत. त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आज, आत्तापासून सज्ज व्हावे, असे आवाहन राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. 

राज्यात नवं समीकरण असलं तरी शिवसेना म्हणून पुढील काळात स्वबळावर सर्व निवडणुका लढवायच्या आहे, असा निश्‍चय त्यांनी शिवसैनिकांसमोर केला. जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात संजय राठोड बोलत होते. सत्ताधारी असतानाही आज आपल्याला त्रास होतोय, मी मंत्रिमंडळात असल्याने मला सर्व माहिती आहे, ते सर्व येथे सांगता येणार नाही. मात्र, उद्धवजींना देखील त्रास होतोय. केंद्रातून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप राठोड यांनी केला. शिवसैनिकांनो आगामी नगर पंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद च्या सर्व निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत, असेही ते म्हणाले.

निवडणुकांच्या तयारीसाठी जोमानं तयारीला लागा, जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आपल्यापेक्षाही जास्त भांडणं असल्याने 50 टक्के अशासकीय समित्यांवर शिवसैनिकांची नियुक्ती केली जाईल. आता त्यांची वाट बघणार नाही. अशीही घोषणा संजय राठोड यांनी केल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीत सर्व आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राठोड यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत नवा वाद उफाळण्याची देखील चिन्हे आहेत. 

विरोधी पक्ष भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर नवे प्रहार होत असताना वनमंत्री संजय राठोड यांचे हे विधान महाविकास आघाडी सरकारसाठी कधीही घातक ठरू शकते. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही दखल घेतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राठोडांच्या या वक्तव्याची कशी दखल घेतात, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Latest Marathi News Updates : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीसाठी काँग्रेसची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक

IND vs AUS 1st Test: टीम इंडियाचा विजय अन् पाकिस्तानला धक्का; Jasprit Bumrah ने मोडला कपिल देव यांचा विक्रम, ७ मोठे पराक्रम

Eknath Shinde: शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंची मागाठाणेत हॅट्‌ट्रिक, जाणून घ्या विजयाची इनसाइड स्टोरी

Sangli Election Results : पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात? खाडे, गाडगीळ, पडळकर, बाबर यापैकी एकाला मिळणार संधी

SCROLL FOR NEXT