weather update rain forecast wardha flood 42 villages loss connectivity red alert 400 people stuck Hinganghat sakal
विदर्भ

वर्ध्यात पुरामुळे ४२ गावांचा संपर्क तुटला

विदर्भात पावसाचा जोर कायम

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. बहुतेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विदर्भातील बहुतांश धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी काठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. वर्ध्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ४२ गावांचा संपर्क तुटला असून हिंगणघाटात ४०० जण अडकले आहेत.

यंदाच्या वर्षी सर्वदूर विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या आठ दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली आहे. पूर्व किनारपट्टीवर असलेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या विदर्भाकडे सरकल्याने विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये पावसाच्या दमदार सरींनी हजेरी लावली आहे. वर्धा जिल्ह्यात आठ तालुक्यांतील ४२ गावांचा संपर्क तुटला असून वर्धा, यशोदा, वणा नदीला पूर आला आहे. बोर धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यामुळे अनेक गावांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हिंगणघाटात ४०० जण अडकले असून बचाव कार्य सुरू आहे. यवतमाळमध्ये रविवारपासून संततधार सुरू आहे. बाभुळगांव,कळंब, नेर आणि राळेगाव तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. बेंबळासह सर्व प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहे.

चिमूर शहरातील आठ गावांना पूराचा फटका बसला आहे. गडचिरोलीत पूरस्थिती कायम आहे. जिल्ह्यातील ऐटापल्ली, सिरोंचा, अहेरी आणि भामरागड येथील रस्ते पाण्याखाली गेल्याने त्यागावांचा संपर्क तुटला आहे. भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अंतर्गत चार-पाच गावातील पूलावर पाणी असल्याने वाहतूक प्रभावीत झाली आहे. गोंदिया जिल्ह्याला यलो अलर्ट दिला असून अर्जुनीमोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे बुलडाणाच्या घाटाखालील तीन तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. अकोल्यातील बाळापूर शहरात तिन्ही नद्यांना पूर आला आहे.

पावसाचा इशारा

पूर्व किनाऱ्यावर सातत्याने टिकून असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता विदर्भाकडे सरकले असून दुसरीकडे मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे कायम असल्याने राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण उत्तर मराठवाड्यासह विदर्भात ढग दाटले. अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सध्या पश्चिमेकडे ओमानकडे सरकत आहे. या ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून उत्तर ओडिशा आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता विदर्भाकडे सरकले आहे. त्यात मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. तर गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत असलेला समांतर कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. परिणामी पश्‍चिम विदर्भात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

राज्यातील पूरस्थिती

जळगाव आणि वाशिममध्ये रविवारी मध्यरात्रीपासून पाऊस

नाशिक जिल्ह्यातील नऊ धरणे भरली

वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ

बुलडाणा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू

जळगावमधील हातनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले

मराठवाड्यातही रिमझिम पाऊस

अकोला, अमरावती जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

मध्य महाराष्ट्र, कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार! उद्धव ठाकरेंची कोल्हापूरात घोषणा, महायुतीवर हल्लाबोल

सुशांत सिंग राजपूतची हत्याच! सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा धक्कादायक दावा; म्हणाली- एम्सच्या डॉक्टरने रिपोर्ट...

IPS Sanjay Verma : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana : तुम्ही बळ दिलं तर... लाडक्या बहीणींना मुख्यमंत्र्यांचं मोठं आश्वासन; डिंसेंबरच्या हप्त्याबद्दलही सांगितलं

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

SCROLL FOR NEXT